करुणानिधींच्या प्रकृतीत सुधारणा, ताप आणि संसर्ग झाला कमी- स्टॅलिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 16:48 IST2018-07-27T16:47:17+5:302018-07-27T16:48:43+5:30

डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Improvement in the effects of Karunanidhi, fever and infection is low-stalin | करुणानिधींच्या प्रकृतीत सुधारणा, ताप आणि संसर्ग झाला कमी- स्टॅलिन

करुणानिधींच्या प्रकृतीत सुधारणा, ताप आणि संसर्ग झाला कमी- स्टॅलिन

<p>नवी दिल्ली- डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या घरी नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. कालपासून करुणानिधींच्या शरीरातील ताप आणि संसर्ग वाढत चालला होता. परंतु आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष स्टॅलिन म्हणाले आहेत.

करुणानिधी हे सध्या 96 वर्षांचे आहेत. अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना कावेरी रुग्णालयाच्या दाखल करण्यात आलं होतं. करुणानिधी यांच्या किडनीला इन्फेक्शन झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काल त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर गोपालपूरम या त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू आहे. डॉक्टर आणि परिचारिकांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहे. स्टॅलिन म्हणाले, करुणानिधींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांचा ताप आणि संसर्ग कमी होत आहे. गोपालपूरमधल्या करुणानिधी यांच्या घराबाहेर द्रमुकच्या कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली आहे.

 

Web Title: Improvement in the effects of Karunanidhi, fever and infection is low-stalin