सुधारित : जम्मू-काश्मीर सत्ता स्थापना

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:19+5:302015-02-16T23:55:19+5:30

जम्मू-काश्मिरात सत्तास्थापनेसंदर्भातील

Improved: Jammu-Kashmir power establishment | सुधारित : जम्मू-काश्मीर सत्ता स्थापना

सुधारित : जम्मू-काश्मीर सत्ता स्थापना

्मू-काश्मिरात सत्तास्थापनेसंदर्भातील
पीडीपी-भाजप चर्चा वांध्यात?
नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरात सत्तास्थापनेच्या मुद्यावर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी(पीडीपी) आणि भाजप यांच्यातील प्रस्तावित आघाडीबाबत चर्चा पुन्हा एकदा वांध्यात सापडल्याची चिन्हे आहेत़ भारतीय राज्यघटनेचे कलम ३७० आणि वादग्रस्त सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याच्या मुद्यावर दोन्ही पक्ष तडजोड करायला तयार नसल्याने उभय पक्षांतील चर्चेची गाडी अद्यापही पुढे सरकलेली नाही़ अशातच पीडीपीने भाजपसमोर ११ कलमी प्रस्तावही ठेवला आहे़
सूत्रांच्या मते, पीडीपी-भाजपतील समान किमान कार्यक्रम हा सार्वजनिक दस्तऐवज असेल, असे पीडीपीने जाहीर केल्याने भाजपच्या भुवया उंचावल्या आहेत़ राज्याला विशेष दर्जा देणार्‍या कलम ३७० चा मुद्दा उपस्थित न करण्याचे लेखी आश्वासन देण्यावरूनही भाजप अडचणीत सापडला आहे़
संसदेच्या येत्या २३ फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जम्मू-काश्मिरात सत्ता स्थापन होईल, असे संकेत गत आठवड्यात मिळाले होते़ त्यादृष्टीने भाजप-पीडीपी चर्चेतून सकारात्मक निर्णय अपेक्षित असताना अद्यापही उभय पक्षांतील चर्चेचे गुर्‍हाळ संपलेले नाही़ अर्थात आमच्यात निर्णायक चर्चा सुरू असल्याचा दावा भाजप व पीडीपी दोन्ही पक्ष करीत आहेत़
या संपूर्ण पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना, पीडीपीचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे़ मतभेदापेक्षा असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर पीडीपी-भाजपत सहमती आहे़ मतभेद असले तरी आम्ही चर्चेतून त्यावर तोडगा काढू यावर आम्हाला विश्वास असल्याचे अख्तर यांनी म्हटले आहे़
याउलट राज्यात स्थिर आणि जबाबदार सरकार देण्याच्या दृष्टीने आम्ही आशावादी असल्याचे भाजप नेते निर्मल सिंग यांनी म्हटले आहे़


Web Title: Improved: Jammu-Kashmir power establishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.