महत्त्वाचे -मोदींनी घेतली भागवत, राजनाथसिंहांची भेट

By Admin | Updated: May 11, 2014 00:35 IST2014-05-11T00:35:30+5:302014-05-11T00:35:30+5:30

सर्व आवृत्त्यांनी आवश्य वापरावे़

Important: Modi's meeting with Bhagwat, Rajnath Singh | महत्त्वाचे -मोदींनी घेतली भागवत, राजनाथसिंहांची भेट

महत्त्वाचे -मोदींनी घेतली भागवत, राजनाथसिंहांची भेट

्व आवृत्त्यांनी आवश्य वापरावे़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
मोदींनी घेतली भागवत, राजनाथसिंहांची भेट
जयशंकर गुप्त/नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अंतिम टप्प्याचा निवडणूक प्रचार संपल्यानंतर भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ़ मोहन भागवत यांची भेट घेतली़ या भेटीत आठ टप्प्यांत झालेल्या निवडणुकीतील भाजपा आणि एनडीएतील घटक पक्षांच्या स्थितीबाबत मोदींनी भागवत यांना माहिती दिली़ नवीन सरकार स्थापनेच्या शक्यता आणि समीकरणांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते़ यावेळी संघाचे ज्येष्ठ नेते सुरेश सोनी उपस्थित होते़ विशेष म्हणजे भाजपा आणि संघाच्या नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते़ गेल्या ४० वर्षांपासून आडवाणी यांनी संघ आणि भाजपा यांच्यात दुवा साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे़
भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवव्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपवून दिल्लीत पोहोचलेल्या मोदींनी सर्वप्रथम माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेतली़ निवडणूक अभियान सुरू करण्यापूर्वी मोदींनी वाजपेयी यांचे आशीर्वाद घेतले होते़ त्यानंतर ते भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी गेले़ राजनाथ यांच्या समवेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात डॉ़ मोहन भागवत यांच्या भेटीसाठी गेले़ लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या नाराजीनंतरही मोदींना भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते़ मिशन २७२ प्लस पूर्ण करण्यासाठी संघ पूर्ण ताकदीनीशी मोदींच्या पाठीशी राहिला आहे़ पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेण्याचा सल्ला भागवत यांनी मोदींना भेटीदरम्यान दिल्याचे समजते़ काही दिवसांपूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी नागपूरमध्ये सरसंघचालक भागवत यांची भेट घेऊन मोदींची कार्यशैली आणि पक्षात ज्येष्ठ नेत्यांची होणारी उपेक्षा याबाबत तक्रार केली होती़ त्यापार्श्वभूमीवर भागवत यांनी मोदींना हा सल्ला दिल्याचे समजते़

Web Title: Important: Modi's meeting with Bhagwat, Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.