महत्वाचे... जोड
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:41+5:302015-02-15T22:36:41+5:30
रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा

महत्वाचे... जोड
र ्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबाकामठी : शहरातील किराणा ओळी परिसरातील बँक ऑफ इंडियासमोर वाहनतळ नाही. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. ही बाब नित्याचीच झाली आहे. या परिसरातून पादचाऱ्यांना वाट काढताना त्रास सहन करावा लागतो. शिवाय वाहनांच्या गर्दीमुळे लहान-मोठे अपघात घडतात. रस्त्यावरील पार्किर्ं गला आळा घालावा, अशी नागरिकांची मागणी आहे. .....बीएसएनएल टॉवरची रेंज वाढवानांद : बीएसएनएलच्या टॉवरच्या कमी रेंजमुळे परिसरातील गावात बीएसएनएल सीमकार्ड धारकांचे मोबाईल नावापुरतेच ठरत आहेत. मोबाईलवर संपर्क साधला असता, कव्हरेजच्या बाहेर संदेश कानी पडतो. मोबाईल आज मूलभूत गरज बनली असून त्याचा उपयोग होत नसल्याने टॉवरची रेंज वाढविण्याची मागणी केली जात आहे. ........ब्लिचिंग पावडरचा पुरवठा कराकुही : स्थानिक व तालुक्यातील अनेक गावात विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सार्वजनिक विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून पाणी निजंर्तूक करावे, जेणे करून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होईल......अनियमित स्वच्छतेमुळे नाल्या तुंबल्याकाटोल : शहरातील जुन्या वस्ती भागात नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष देत नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी व्यक्त होत आहे. .....गावात मूलभूत सुविधांचा अभावगुमथळा : गावात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावात अस्वच्छता असून विकास कामे रखडली आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसते. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.