महत्त्वाचे /अकोला
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:33+5:302015-08-31T00:24:33+5:30
रक्षाबंधनातून बीज संगोपन

महत्त्वाचे /अकोला
र ्षाबंधनातून बीज संगोपनअकोला : डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. त्यांनी उन्हाळ्यात विविध वनस्पतींच्या गोळा केलेल्या बियांपासून राख्या बनविल्या. या राख्या विद्यार्थिनींनी विद्यार्थी बांधवांना बांधल्या. या बिया जिथे पडतील तिथे झाडे उगवतील आणि वृक्षारोपण होईल, हा उद्देश ठेवून हे अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.हमालांचा कामावर बहिष्कारवाशिम : कृषी उत्पन्न बाजार समितीतील मतदार यादीमधील हमालांची संख्या आणि प्रत्यक्ष कामावरील हमाल यांच्यामध्ये तफावत आहे. सर्व हमालांना जोपर्यंत कामावर बोलावत नाहीत, तोपर्यंत कामावर बहिष्कार राहील, असा पवित्रा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ३०० हमालांनी घेतला आहे. गत पाच दिवसांपासून हमालांनी कामावर बहिष्कार घातला आहे.जुगार्यास पकडलेबुलडाणा : स्थानिक त्रिशरण चौकातील एका चहाच्या हॉटेलमागे जुगार सुरू असताना पोलिसांनी धाड टाकून प्रल्हाद यादवराव गवई या आरोपीस शनिवारी पकडले. या वेळी जुगाराचे साहित्यासह ५९५ रुपये जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.