तीन जवानांच्या हौतात्म्यानंतर लगेच २ अतिरेक्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 05:36 IST2020-08-18T05:36:32+5:302020-08-18T05:36:41+5:30

ते दोघेही ‘लष्कर-ए-तैयबा’ संघटनेचे असल्याचे सांगण्यात आले. या संघटनेचा कमांडर सज्जाद उर्फ हैदर या मारला गेला आहे.

Immediately after the martyrdom of three soldiers, two militants were killed | तीन जवानांच्या हौतात्म्यानंतर लगेच २ अतिरेक्यांचा खात्मा

तीन जवानांच्या हौतात्म्यानंतर लगेच २ अतिरेक्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील क्रिरी भागात सोमवारी सकाळी संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)चे दोन जवान व एक पोलीस शिपाई असे तिघे शहीद झाले. त्यानंतर काही तासांतच सुरक्षा दलांनी त्या संपूर्ण भागास वेढा घालून पळून गेलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. स्थानिक पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात ‘सीआरपीएफ’चे दोन जवान व एक पोलीस शिपाई असे तिघे शहीद झाले. त्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाई दोन अतिरेकी ठार झाले. ते दोघेही ‘लष्कर-ए-तैयबा’ संघटनेचे असल्याचे सांगण्यात आले. या संघटनेचा कमांडर सज्जाद उर्फ हैदर या मारला गेला आहे.

Web Title: Immediately after the martyrdom of three soldiers, two militants were killed