शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

"आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मान करतो"; पतंजली योगपीठानं फेटाळले बाबा रामदेव यांच्यावरील आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 11:08 AM

कोरोनावरील उपचारपद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटिबॉयोटिक्सही फेल ठरल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. IMA नं केली होती बाबा रामदेव यांच्यावर कारवाईची मागणी.

ठळक मुद्देकोरोनावरील उपचारपद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटिबॉयोटिक्सही फेल ठरल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं.IMA नं केली होती बाबा रामदेव यांच्यावर कारवाईची मागणी.

ॲलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे. कोरोनावरील उपचारात सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरलं. त्यानंतर, प्लाझा थेरपी अन् रेमडेसिविर इंजेक्शनही फेल ठरल्याचं योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. कोरोनावरील उपचारपद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटिबॉयोटिक्सही फेल ठरल्याचंही ते म्हणाले होते. विशेष म्हणजे रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता, ॲलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावाही त्यांनी केला. इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांनी केलेल्या दाव्यावरून संताप व्यक्त केला. तसंच, बाबा रामदेव यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणीही संघटनेच्या वतीने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे करण्यात आली होती. दरम्यान, यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठानं हे आरोप फेटाळून लावले.यानंतर बाबा रामदेव यांच्या हरिद्वार येथील पंतजली योगपीठ ट्रस्टकडून एक निवेदन जारी करण्यात आलं. "या महासाथीमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत जे दिवस-रात्र काम करत आहेत अशा डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बाबा रामदेव सन्मान करतात. ते कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या अन्य सदस्यांना व्हॉट्सअॅपवरील आलेला संदेश वाचून दाखवत होते," असं त्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. "बाबा रामदेव हे आधुनिक विज्ञान आणि आधुनिक उपचार पद्धतीनं उपचार करणाऱ्यांविरोधात कोणत्याही पद्धतीचा चुकीचा विचार नाही. त्यांच्या विरोधात केले जाणारे आरोप निरर्थक आणि अयोग्य आहेत," असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. पतंजली योगपीठाचे महासचिव आचार्य बाळकृष्ण यांची स्वाक्षरी असलेलं निवेदन पतंजली योगपीठाकडून जारी करण्यात आलं आहे. IMA कडून कारवाईची मागणीइंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या व्हायरल व्हिडिओसंदर्भात परिपत्रक जारी केलं होतं. त्यामध्ये, बाबा रामदेव यांनी केलेला दावा स्वीकारून आधुनिक उपचारपद्धती बंद करावी.  अन्यथा बाबा रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, आपत्ती व्यवस्थापन महामारी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करावा, असंही मेडिकल असोसिएशन संघटनेनं आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना उद्देशून म्हटलं. इंडियन मेडिकल असोसिएशननं रामदेवबाबा यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. आरोप, वक्तव्ये सिद्ध करा किंवा माफी मागा अन्यथा ॲलोपॅथीची बदनामी केल्याबद्दल कोर्टात जाऊ असा इशारा दिला होता. 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdoctorडॉक्टरMediaमाध्यमेpatanjaliपतंजली