शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

वाद पेटला! IMAनं बाबा रामदेवांना पाठवली 1000 कोटींची नोटीस; 15 दिवसांत मागायला सांगितली लेखी माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 12:46 PM

नोटिशीत म्हणण्यात आले आहे, की बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी केली जाईल.

नवी दिल्ली - अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून योगगुरू बाबा रामदेव चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने बाबा रामदेव यांना 1000 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठविली आहे. यात बाबा रामदेवांना पुढील 15 दिवसांत त्यांच्या वक्तव्याचे खंडन करणारा व्हिडिओ जारी करून लेखी माफी मागायला सांगितले आहे. (IMA sends defamation notice of RS 1000 cr to Baba Ramdev and ask for written apology)

नोटिशीत म्हणण्यात आले आहे, की बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी केली जाईल. याच बरोबर रामदेव यांना 72 तासांच्या आत, कोरोनिल किटची दिशाभूल करणारी जाहिरातही सर्व ठिकाणांहून हटविण्यास सांगण्यात आले आहे. कोरोनिल कोविड व्हॅक्सीननंतर होणाऱ्या साइड इफेक्ट्सवर प्रभावी असल्याचा दावा, या जाहिरातीत करण्यात आला आहे.

अरेस्ट तर कोणाचा बापही करू शकत नाही, बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल

रामदेवांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य -काही दिवसांपूर्वीच बाबा रामदेव एका कार्यक्रमात म्हणाले होते, अ‍ॅलोपॅथी ओषधं घेतल्याने लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. अ‍ॅलोपॅथी स्टुपीड आणि दिवाळखोर सायन्स असल्याचेही बाबा रामदेव यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यांवरून वाद वाढल्यानंतर आणि केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या भूमिकेनंतर रामदेव यांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते.

बाबा रामदेव यांच्या वागणूकीवर संतापले हंसल मेहता, हा 'इडियट' माणूस...

रामदेवांनी विचारले 25 प्रश्न -बाबा रामदेवांनी एक पत्र काढून हेपटाइटिस, लिव्हर सोयरायसिस, हार्ट एनलार्जमेंट, शुगर लेवल 1 आणि 2, फॅटी लिव्हर, थायरॉइड, ब्लॉकेज, बायपास, मायग्रेन, पायरिया, निद्रानाश, स्ट्रेस, ड्रग्स अ‍ॅडिक्शन, आदिंवरील कायम उपचारांबद्दल प्रश्न विचारले. एवढेच नाही, तर अमेरिकेचे डॉक्टर बोलतात, डब्ल्यूएचओ म्हणते, तेव्हा का नाही बोलत कोणी? मी जर डॉक्टरांचा आणि मेडिकल सायन्सचा सन्मान करतो, तर तुम्ही आयुर्वेदाचा सन्मान का करत नाही? आयुर्वेदावर टीका का केली जाते, शिव्या का दिल्या जातात? फार्मा कंपन्या खूप आहेत, मग डॉक्टर त्यांचे बळी का ठरत आहेत. डॉक्टर तर फार्मा कंपनीचा प्रतिनिधी नसतो, असेही बाबा रामदेव म्हणाले होते.

ॲलोपॅथीला दिवाळखोरी ठरवणं दुर्दैव -"कोरोनावरील उपचारांमध्ये ॲलोपॅथी औषधाला तमाशा, निरुपयोगी आणि दिवाळखोर ठरवणे अतिशय दुर्दैवी आहे. आज लाखो लोक ॲलोपॅथीमुळेच कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज देशात कोरोनाचा मृत्यूदर फक्त 1.13 टक्के आणि बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के एवढे आहे. यामागे ॲलोपॅथी आणि डॉक्टरांचे सर्वात मोठे योगदान आहे. उपचारांच्या सध्याच्या प्रक्रियेला तमाशा संबोधने ॲलोपथी उपचारांचीच नव्हे, तर डॉक्टरांच्या आत्मविश्वासाला धक्कदा पोहोचविण्यासारखे आहे. तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणावर मी नाराज आहे," असे रोखठोक मत डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीmedicinesऔषधंMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर