आय एम सॉरी... माझ्या हातून चू
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:07+5:302015-08-02T22:55:07+5:30
क झाली

आय एम सॉरी... माझ्या हातून चू
क झालीनवजात अर्भकाला सोडले अनाथ आश्रमाच्या पायरीवरबारामती । दि. २ (प्रतिनिधी) आय एम सॉरी... माझ्या हातून चूक झाली आहे. मी कुमारी माता आहे. शिक्षण घेत असल्याने जन्मलेल्या बाळाच्या मी संभाळ करू शकत नाही. आपण बाळाचे पालन पोषण कराल, असा विश्वास आहे. आपण त्याचा संभाळ करावा, ही नम्र विनंती... असे आवाहनक करणार्या चिठ्ठी समवेत सावली अनाथ आश्रमाच्या पायरीवर नवजात बालिकेला रविवारी मध्यरात्री सोडण्यात आले. सुदैवाने सोडलेल्या नवजात अर्भकाचा आवाज ऐकून येथील अहिवळे दाम्पत्याने मायेची ऊब दिली. बारामती परिसरातील जळोची येथे सावली अनाथ आश्रम आहे. या ठिकाणी रविवारी मध्यरात्री नवजात बालिकेला स्कार्फ, ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले. यावेळी बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकूण आश्रमचे संचालक महेश अहिवळे, झरिना खान हे दोघे बाहेर आले. नवजात अर्भकाबरोबर बाळाचा संभाळ करावा, अशी विनंती करणारी चिठ्ठी देखील ठेवलेली सापडली आहे. त्यांनी तातडीने बाळ कुशीत घेतले. हा प्रकार पोलीस उपनिरीक्षक सुनिल गायकवाड यांना सांगण्यात आला. त्यानंतर गायकवाड तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले. अहिवळे यांच्यासह गायकवाड यांनी संबंधितांचा शोध घेतला. मात्र, तो प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर बाळाला तत्काळ रूई ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी बाळावर प्रथमोपचार करण्यात आले. या दरम्यान, महिला व बालकल्याण खात्याच्या सदस्या अनिता विपत यांच्याशी या प्रकाराबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर विपत यांच्या सुचनेनुसार बाळाला केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केंद्र येथे ठेवण्यात आले आहे. अहिवळे दाम्पत्याच्या जागरूकतेमुळे नवजात बालिकेचा जीव वाचला. एकांतात असणार्या या आश्रमात बाळाकडे वेळीत लक्ष गेले नसते तर अनर्थ ओढविण्याची भीती होती. मात्र, देवतारी त्याला कोण मारी, ही म्हण सार्थ ठरली आहे. बारामती शहरात काही दिवसांपूर्वी इंदापूर रस्त्यालगत मृत नवजात अर्भकाला बेवारस अवस्थेत टाकून देण्यात आले होते. त्यानंतर घडलेली ही दुसरी घटना आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जे. सोनवणे करीत आहेत.