द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:49 IST2025-12-06T14:49:36+5:302025-12-06T14:49:58+5:30
Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेशमधील पांवटा साहिब येथील सूरजपूर येथे प्रसिद्ध रेसलर द ग्रेट खलीच्या जमिनीबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. शुक्रवारी सुरजपूर येथील काही महिला द ग्रेट खलीसोबत नाहन येथे पोहोचल्या आणि त्यांनी उपायुक्त प्रियंका वर्मा यांची भेट घेऊन तक्रार मांडली.

द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
हिमाचल प्रदेशमधील पांवटा साहिब येथील सूरजपूर येथे प्रसिद्ध रेसलर द ग्रेट खलीच्या जमिनीबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. शुक्रवारी सुरजपूर येथील काही महिला द ग्रेट खलीसोबत नाहन येथे पोहोचल्या आणि त्यांनी उपायुक्त प्रियंका वर्मा यांची भेट घेऊन तक्रार मांडली. त्यांनी जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केल्याचा आरोप करत आपली संपूर्ण तक्रार उपायुक्तांसमोर मांडली. यावेळी खली आमि महिलांनी उपायुक्तांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तसेच निष्पक्षपणे कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, प्रशासनाने योग्य ती चौकशी करावी आणि तिथे राहणाऱ्या कुटुंबीयांसोबत न्याय करावा.
तक्रारकर्त्यांनी सांगितले की, ते २८-०८ बीघा जमिनीचे सहहिस्सेदार आहेत. गेल्या पाच दशकांपासून आम्ही येथे राहत आहोत. मात्र आता कुटुंबीयांवर अचानक दबाव आणला जात आहे. तसेच आमची जमिन हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना खली याने सांगितले की, २० मे रोजी २०२५ रोजी पहिल्यांदा काही जणांनी जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ, महिला आणि तक्कारदारांनी घटनास्थळी पोहोचून हे प्रयत्न हाणून पाडले. ही संपूर्ण कारवाई महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीमधून करण्यात आला. तर दुसरी घटना ही १८ जुलै २०२५ रोजी घडली. तसेच काही लोकांनी पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला.
संबंधित तहसीलदार ऐणि काही महसूल अधिकारी आपल्याकडील अधिकारांचा चुकीचा वापर करत आहेत, असा आरोपही तक्रारीमधून करण्यात आला आहे. हे अधिकारी खाजगी व्यक्तींना लाभ मिळवून देण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. आमच्याकडे जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत, आवश्यकता भासल्यावर ती सादर केली जातील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, द ग्रेट खली आणि इतर महिलांनी पप्रसारमाध्यमांसमोर येऊन केलेल्या आरोपांनंतर पांवटा साहीबचे तहसीलदार ऋषभ शर्मा यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. तसेच त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.