शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

IIT-BHU : सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींसोबत भाजप आमदार; व्हायरल फोटोवर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 16:55 IST

IIT-BHU News : गेल्यावर्षी वाराणसीतील IIT-BHU मध्ये बी टेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या आरोपींना जामीन मिळाला आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींसोबत भाजप आमदाराचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

IIT-BHU Case Update : २२ ऑगस्ट २०२३ रोजी वाराणसीमधील आयआयटी बीएचयू मधील बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचे तीन सदस्यांना अटक करण्यात आली. आता तीन पैकी कुणाल पांडे आणि अभिषेक चौहान ऊर्फ आनंद या दोघांना उच्च न्यायालयाने जामीन मजूर केला आणि हे प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. यात आता भाजपच्या एका आमदाराचा दोन्ही आरोपींसोबतचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. 

आरोपींचे जल्लोषात स्वागत

उच्च न्यायालयात दोन आरोपींना जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर याबद्दल संताप व्यक्त होत आहे. विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे. दोन्ही आरोपी जामिनावर सुटल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आल्याचेही वृत्त आहे.   

भाजप आमदाराचे आरोपींसोबत सेलिब्रेशन

जामिनावर सुटलेल्या आरोपींसोबत भाजप आमदार सौरभ श्रीवास्तव वाढदिवस साजरा करत असल्याचा एक फोटो  व्हायरल झाला आहे. त्यावरूनही भाजपवर टीका होत आहे. फोटोमध्ये आमदार श्रीवास्तव हे आरोपी कुणाल पांडे आणि अभिषेक चौहानसोबत दिसत आहे. श्रीवास्तव हे अभिषेक चौहानच्या तोंडाला केक लावताना फोटोमध्ये दिसत आहे.  

व्हायरल होत असलेल्या या फोटोबद्दल आमदार श्रीवास्तव यांनी खुलासा केला आहे. आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, "हा फोटो जवळपास पाच वर्षांपूर्वीचा आहे. हा फोटो कोरोना काळातील आहे, हे दिसत आहे कारण मास्क दिसत आहे."

"कार्यकर्ता हा सदस्य असतो. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी केक कापावा लागला. तिन्ही आरोपींसोबत माझे आता कोणतेही संबंध नाहीत", असे श्रीवास्तव यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाMLAआमदारSocial Viralसोशल व्हायरल