IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:50 IST2026-04-06T16:48:34+5:302026-04-06T16:50:39+5:30

IIT Baba Abhay Singh Marriage: महाकुंभ फेम 'आयआयटी बाबा' अभय सिंह लग्नानंतर पहिल्यांदाच झाझरमध्ये आले आहेत. आधुनिक विज्ञान आणि अध्यात्म जोडणारी 'श्री युनिव्हर्सिटी' उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

IIT baba Abhay Singh secretly got married! The couple reached home to surprise Father, will he leave sannyas and talk about 'spirituality' in the world? | IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?

IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?

IIT Baba Abhay Singh Marriage: महाकुंभवेळी सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला 'आयआयटी बाबा'ने गुपचूप लग्न उरकले आहे. पत्नीला घेऊन घरच्यांना सरप्राईज देण्यासाठी अभय सिंह  हरियाणातील झाझरमध्ये पोहोचले. आयआयटीचे शिक्षण घेतलेला, सर्व सुखाचा त्याग करून संन्याशी झालेल्या आपल्या मुलाला पत्नीसोबत पाहून घरचे देखील शॉक झाले आहेत.

प्रयागराज महाकुंभमध्ये आपल्या उच्चशिक्षित पार्श्वभूमीमुळे आणि साधू वेशभूषेमुळे प्रकाशझोतात आलेले 'IIT बाबा' ऊर्फ अभय सिंह सोमवारी आपल्या पत्नीसह आपल्या मूळ गावी, झाझरमध्ये पोहोचले. लग्नानंतर ते पहिल्यांदाच झाझरमध्ये आले असून, बँक खात्याचे KYC अपडेट करण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय गाठले होते. यावेळी त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

अभय सिंह यांनी झाझर तहसील परिसरातील त्यांचे वडील जे पेशाने वकील आहेत यांच्या चेंबरमध्ये काही वेळ थांबले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रीतिका देखील होती. प्रीतिका या मूळच्या बेंगळुरूच्या असून, त्यादेखील अभय सिंह यांच्या आध्यात्मिक कार्यात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. 

लग्नानंतरचा प्रवास आणि कौटुंबिक भूमिका
अभय सिंह यांनी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे प्रीतिका यांच्याशी विवाह केला आणि १९ फेब्रुवारी रोजी कोर्ट मॅरेज देखील केले. सध्या हे दाम्पत्य हिमाचलमध्ये वास्तव्यास आहे. कुटुंबाविषयी बोलताना अभय सिंह म्हणाले की, "मोठ्या कुटुंबासाठी (समाजासाठी) छोट्या कुटुंबाचा त्याग करावा लागतो, तरीही मी माझ्या माता-पित्यांची भेट नक्कीच घेईन."

कोण आहेत अभय सिंह?
IIT कानपूरसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर अभय सिंह यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. महाकुंभमध्ये त्यांच्या स्पष्ट विचारांमुळे आणि आगळ्यावेगळ्या जीवनशैलीमुळे त्यांची देशभरात चर्चा झाली होती. आता गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतरही त्यांची आध्यात्मिक आणि शैक्षणिक यात्रा सुरूच आहे.

Web Title: IIT baba Abhay Singh secretly got married! The couple reached home to surprise Father, will he leave sannyas and talk about 'spirituality' in the world?