IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 19:06 IST2025-05-03T19:02:08+5:302025-05-03T19:06:28+5:30
Government Jobs: इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने आईटीएस पदांसाठी भरतीची घोषणा केली.

IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
अभियांत्रिकी पदवीधरांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने आईटीएस पदांसाठी भरतीची घोषणा केली. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत एकूण ४९ रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०२५ निश्चित करण्यात आली. यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजेंस या विषयात अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवार २१ ते ३० वयोगतील असावे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड २०२५ च्या गेट स्कोअरच्या आधारे केली जाईल. शॉर्टलिस्टिंगनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. निवड प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित ठेवण्यासाठी आयएचएमसीएल विविध स्तरांवर पडताळणी करेल.
१ लाखांहून अधिक पगार
या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना ई-१ ग्रेड अंतर्गत ४० हजार ते १ लाख ४०,००० रुपयांपर्यंत वेतन मिळेल. सुरुवातीचा मासिक पगार सुमारे ८४,००० रुपये असू शकतो, ज्यामध्ये महागाई भत्ता, एचआरए आणि इतर फायदे समाविष्ट असतील. निवड झालेल्या उमेदवाराचा वार्षिक सीटीसी ११ लाखापर्यंत पोहोचू शकते.
अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम उमेदवारांनी आयएचएमसीएल अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- त्यानंतर आयएचएमसीएल भरती २०२५ या पर्यायावर क्लिक करावे.
- पुढे आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंटआऊट काढून घ्या.