शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाचा इन्शुरन्स रिन्यू करायचाय तर आधी पीयुसी प्रमाणपत्र घ्या ; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 19:58 IST

विमा कंपन्यांकडून मार्गदर्शक सूचना जारी

ठळक मुद्देवाहनाचा विमा काढायचा असेल अथवा तो रिन्यु करायचा असेल तर पीयुसी प्रमाणपत्र आवश्यक असणार

पुणे : वाहनांच्या धुरांमुळे होणारे वायु प्रदुषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २ वर्षांपूर्वी पीयुसी प्रमाणपत्र असल्याशिवाय वाहन इन्शुरन्स काढता येणार नाही अथवा ते रिन्यु करता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय दिला होता. त्यांची अंमलबजावणी करण्यासंबंधी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने परिपत्रक आता काढले आहे. त्यानुसार वाहनाचा विमा काढायचा असेल अथवा तो रिन्यु करायचा असेल तर पीयुसी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.त्यानुसार जर अपघातासंबंधी एकाचा दावा नोंदवायचा असेल तर त्यावेळी पीयुसी प्रमाणपत्र नसेल अथवा त्याची वैधता संपली असेल तर विमा कंपनी असा दावा मान्य करणार नाही. याबाबत अ‍ॅड. रोहित एरंडे यांनी सांगितले की, देशभरातील पीयूसी सेन्टर्स ऑनलाइन पद्धतीने केंद्र सरकारच्या ‘वाहन’ प्रणालीशी जोडणे, इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांच्याकडील ज्या वाहनांची पीयूसी तपासणी केली आहे. त्यांच्याबद्दलची माहिती वाहन मंत्रालयाला दयावी जेणेकरून पीयूसी नसलेल्या वाहन मालकांना नोटीस बजावत येतील आणि भारतभर ‘नो पीयूसी नो पॉलिसी’ याचा प्रसार आणि प्रचार सरकारने करावा अश्या सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आल्यावर आयआरडीएआय ह्या इन्शुरन्स कंपन्यांनवर देखरेख ठेवणाºया संस्थेने नुकतेच २० आॅगस्ट रोजी परिपत्रक काढून वरील निकालाची भारतभर आणि विशेषत: दिल्लीमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ सालीच या मुद्दुयांवर निकाल देऊन वेगवेगळ्या सूचना केंद्र सरकारला केल्या होत्या आणि त्या केंद्र सरकाने मान्य देखील केल्या . उदा. , पीयूसी टेस्ट होण्याच्या आधीच सर्व पैसे देणे, पीयूसी सेन्टर्सची वेळोवेळी काटेकोर पद्धतीने तपासणी होणे आणि गैरमार्ग अवलंबणाऱ्या पीयूसी सेन्टर्सवर कडक कारवाई करणे , जागोजागी प्रदूषण करणाऱ्या वाहनांना ओळखणारी यंत्रणा उभी करणे, नवीन वाहने भारत-४ स्टँडर्ड प्रमाणे असावीत जेणे करून प्रदुषण कमीतकमी होईल आणि प्रदुषण करणाऱ्या वाहन उत्पादकांनाच दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करणे, अश्या अनेक सूचना आहेत. मात्र ज्याची अंमलबजावणी अदयाप झाल्याचे आढळून येत नाही. ़़़़़़़़़़काही तज्ञांच्या मते आता पी.यु.सी. सर्टिफिकेट कालबाह्य झाल्यातच जमा आहे कारण नवीन तंत्रज्ञान वापरलेल्या वाहनांमध्ये (उदा. भारत-६ स्टँडर्ड) पी.यु.सीची गरज देखील नाही. मात्र, सरकार त्यात जोपर्यंत बदल करत नाही़ तोपर्यंत पीयूसी सर्टिफिकेट वेळोवेळी काढणे अनिवार्य आहे.विमा रिन्यु करताना वाहनाचे पीयुसी प्रमाणपत्र आहे, ही जबाबदारी विमा कंपनी आणि वाहनचालकांची आहे, हे लक्षात ठेवावे अन्यथा पॉलिसीला मुकावे लागेल. अ‍ॅड. रोहित एरंडे़.

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार