शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

घरबसल्या 5 कोटींचे बक्षीस जिंका! काळा पैसा, बेनामी मालमत्ता पकडून द्या, इथे तक्रार करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 8:46 AM

Income Tax On Black Money : तक्रार दाखल केल्यानंतर प्रत्येक तक्रारीचा एक विशिष्ट नंबर असणार आहे. तक्रारदार वेबलिंकवर त्याने केलेल्या तक्रारीवरील कारवाई पाहू शकतो. या सुविधेद्वारे कोणीही व्यक्ती अगदी तिथे काम करणारा, नातेवाईक, कार्य़कर्ता आयकर विभागाचा गुप्तहेर बनू शकणार आहे.

नवी दिल्ली : तुमच्या आजुबाजुला असे बरेच शेठ, व्यापारी, राजकारणी महागड्या गाड्यांमधून फिरतात. रुबाब हाणतात. त्यांच्याकडे बराच काळा पैसा किंवा उत्पन्न खूप असते परंतू ते आयकर विभागाला दाखवत नाहीत. अशांबाबत बोटे मोडत बसण्यापेक्षा नामानिराळे राहत त्य़ांची संपत्ती पकडून दिल्यास ५ कोटी रुपयांचे हमखास बक्षिस तुम्हाला मिळू शकते. कसे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

आयकर विभागाने एक नवीन ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. याद्वारे एखाद्याकडे काळा पैसा, बेफाम संपत्ती किंवा कर चोरल्याची माहिती असेल तर ती थेट सरकारला देता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने मंगळवारी ही लिंक सुरु केली आहे. सीबीडीटीने सांगितले की ई-फाइलिंग पोर्टल https://www.incometaxindiaefiling.gov.in वर सोमवारपासून 'कर चोरी किंवा बेनामी मालमत्ता'ची लिंक सुरु केली आहे. 

या सुविधेंतर्गत ज्याच्याकडे पॅन किंवा आधार नंबर आहे किंवा ज्याच्याकडे पॅन, आधार नंबर नाहीय तो देखील तक्रार दाखल करू शकणार आहे. या ऑनलाईन सुविधेमध्ये ओटीपी आधारित प्रक्रियेंतर्गत कोणीही आयकर कायदा 1961 चे उल्लंघन, अघोषित संपत्ती कायदा आणि बेनामी व्यवहार कायद्यांतर्गंत तीन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तक्रार दाखल करता येणार आहे. 

५ कोटींचे बक्षिसतक्रार दाखल केल्यानंतर प्रत्येक तक्रारीचा एक विशिष्ट नंबर असणार आहे. तक्रारदार वेबलिंकवर त्याने केलेल्या तक्रारीवरील कारवाई पाहू शकतो. या सुविधेद्वारे कोणीही व्यक्ती अगदी तिथे काम करणारा, नातेवाईक, कार्य़कर्ता आयकर विभागाचा गुप्तहेर बनू शकणार आहे. त्याला बेनामी संपत्ती प्रकरणात १ कोटी तर विदेशांमध्ये काळेधन ठेवणाऱ्यांची माहिती दिल्यास काही अटींसह 5 कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याची सोय करण्यात आली आहे.

टॅग्स :black moneyब्लॅक मनीIncome Taxइन्कम टॅक्स