शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लढलीस तर ट्रेनसमोर फेकून देईन, भाजपाच्या माजी आमदाराच्या मुलाची बहिणीला धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 14:31 IST

BJP MLA Son Threatens His Sister: या वर्षाच्या अखेरीस देशातील राजस्थानसह पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी कंबर कसली आहे. त्यातून चढाओढ आणि वादविवादही होत आहेत.

या वर्षाच्या अखेरीस देशातील राजस्थानसह पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी कंबर कसली आहे. त्यातून चढाओढ आणि वादविवादही होत आहेत. राजस्थानमधीलभाजपाचे माजी आमदार जयराम जाटव यांच्या मुलाचा एक व्हिडीयो सध्या व्हायरल होत आहे. त्यात तो त्याची बहीण आणि तिच्या मुलग्याला शिविगाळ आणि मारहाण करताना दिसत आहे. तसेच त्याने फोनवरूनही बहिणीला धमकावले होते. बहीण अलवर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने जयराम जाटव यांचा मुलगा बिजेंद्र हा नाराज आहे, त्यातूनच त्याने हे कृत्य केले.

मीना कुमारी ह्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याती तयारी करत आहेत. मीना कुमारी यांचा मुलगा विशाल याने सांगितले की, जेव्हा आम्ही शुक्रवारी संध्याकाळी निवडणुकीसाठीचे बॅनर लावण्यासाठी गेलो तेव्हा थोड्याच वेळात बिजेंद्र तिथे त्याच्या साथीदारांसह पोहोचला. त्याने आम्हाला शिविगाळ केली. तसेच आम्हाला मारहाणही केली. त्यानंतर त्यांनी तिथे लावलेले बॅनर फाडले.

बिजेंद्र याने मीना कुमारी आणि तिच्या मुलाला बॅनर न लावण्याची धमकी दिली आहे. जर बॅनर लावले तर त्याचे परिणाम वाईट होतील असे त्याने सांगितले. मीना कुमारी यांचा मुलगा विशाल याने याची माहिती मालाखेडा पोलिसांना दिली आहे. मात्र पोलिसांनी आपली कुठलीही मदत केली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

मीना कुमारी यांनी सांगितले की, बिजेंद्र याने माझ्या मुलाला मारहाण केली. तसेच नंतर मला फोनवरून शिविगाळ केली. तसेच ट्रेनसमोर फेकण्याची धमकी दिली. पीडित मीना यांनी सांगितले की, माझं गेल्या २० वर्षांपासून माहेरी येणं-जाणं नाही आहे. आम्ही चार बहिणी आणि दोन भाऊ आहोत. त्यामधील बिजेंद्र हा मला उघड उघड धमक्या देत आहे. यावेळी त्यांनी वडील जयराम जाटव यांच्यावरही बोचरी टीका केली. त्या म्हणाल्या की जो माणूस त्याच्या मुलीचा  आणि जावयाचा होऊ शकला नाही, तो सामान्य जनतेचा काय होईल?

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थानFamilyपरिवार