शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तू आलीस तर वातावरण बिघडेल, परीक्षा देऊ नको, बलात्कार पीडितेला परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 06:29 IST

Rajasthan News: गेल्या वर्षी सामूहिक बलात्कार झालेल्या १२वीच्या  विद्यार्थिनीला शाळेने बोर्डाच्या परीक्षेला बसण्यास परवानगी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमध्ये समोर आला आहे.

अजमेर - गेल्या वर्षी सामूहिक बलात्कार झालेल्या १२वीच्या  विद्यार्थिनीला शाळेने बोर्डाच्या परीक्षेला बसण्यास परवानगी नाकारल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमध्ये समोर आला आहे. जर ती परीक्षेला बसली तर ‘वातावरण खराब होईल,’ असे शाळेच्या अधिकाऱ्यांनी तिला सांगितले, असा आरोप या  विद्यार्थिनीने केला आहे. मात्र शाळेने हा दावा फेटाळत ‘ती चार महिन्यांपासून शाळेत आलेली नव्हती, त्यामुळे तिला प्रवेशपत्र देण्यात आले नव्हते,’ असे म्हटले आहे.

विद्यार्थिनीने दुसऱ्या शाळेतील एका शिक्षिकेशी संपर्क साधल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी अजमेरच्या बालकल्याण आयोगाने (सीडब्ल्यूसी) गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.

या विद्यार्थिनीवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिचा नातेवाईक आणि अन्य दोघाजणांनी बलात्कार केला होता. पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, शाळेने तिला घरून अभ्यास करण्यास सांगितले होते. ती शाळेत आल्याने ‘वातावरण बिघडू शकते,’ असे सांगण्यात आल्याने ती घरीच बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होती.

इतर विद्यार्थ्यांच्या पालकांचा आक्षेपइतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी तिच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला होता. ती तिचे प्रवेशपत्र घेण्यासाठी गेली तेव्हा तिला सांगण्यात आले की, ती आता शाळेची विद्यार्थिनी नाही. यामुळे ती निराश झाली आहे. ती एक  हुशार विद्यार्थिनी असून,  तिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ७९ टक्के गुण मिळवले होते, असे आयोगाच्या अध्यक्षा अंजली शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Rajasthanराजस्थानEducationशिक्षणStudentविद्यार्थी