शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

४०० पार बहुमत मिळाल्यास संविधानात बदल करू; भाजपा खासदाराच्या विधानानं वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 12:05 IST

संविधानात बदलासाठी लोकसभा, राज्यसभा दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमतासह दोन तृतीयांश राज्यातही विजय आवश्यक असतो असं त्यांनी सांगितले. 

कर्नाटक - Ananth Kumar Hegde's remarks on the Constitution ( Marathi News ) अबकी बार ४०० पार...बहुमत आल्यास संविधानात बदल करू. संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्यासाठी भाजपा यात दुरुस्ती करेल. त्यासाठी लोकसभेत भाजपा दोन तृतीयांश बहुमत द्या. जेणेकरून देशातील संविधानात बदल करता येऊ शकतो असं वादग्रस्त विधान भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केले आहे. सहा वर्षापूर्वीही अशाचप्रकारे ते बोलले होते. 

हेगडे हे कर्नाटकातून सहा वेळा लोकसभा सदस्य राहिले आहेत. एका रॅलीत अनंत कुमार हेगडे म्हणाले की, काँग्रेसने संविधानात अनावश्यक गोष्टी जबरदस्तीने टाकल्या आहेत. विशेष म्हणजे असे कायदे ज्यातून हिंदू समाजाला दाबण्यासाठी केलेत. हे सर्व बदलायचे आहे. ते बहुमताशिवाय शक्य नाही. आता लोकसभेत काँग्रेस नाही आणि पंतप्रधान मोदींकडे दोन तृतीयांश बहुमत आहे तरीही हे शक्य नाही. कारण संविधानात बदलासाठी लोकसभा, राज्यसभा दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमतासह दोन तृतीयांश राज्यातही विजय आवश्यक असतो असं त्यांनी सांगितले. 

तसेच मोदी यांनी अबकी बार ४०० पार घोषणा दिलीय, ती ४०० पार का? कारण लोकसभेत आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. परंतु राज्यसभेत आमच्याकडे बहुमत नाही. राज्य सरकारमध्येही आमच्याकडे आवश्यक बहुमत नाही. जर आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० जागाहून अधिक जागा मिळाल्या तर राज्यसभेतही बहुमत मिळवण्यासाठी मदत होईल असं खासदार अनंत कुमार हेगडे यांनी म्हटलं. 

राहुल गांधींचा निशाणा

भाजपाला ४०० जागा संविधान बदल करण्यासाठी हव्यात. नरेंद्र मोदी आणि संघ परिवाराचा छुपा अजेंडा आता सार्वजनिक झालाय. मोदी आणि भाजपाला बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवायचे आहे. त्यांना न्याय, समानता, नागरी हक्क आणि स्वातंत्र्य यांच्याशी द्वेष आहे. समाजाचं विभाजन करणे, मीडियाला गुलाम बनवणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे, तपास यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांवर दबाव आणणं, यातून भारताच्या लोकशाहीला हुकुमशाहीत बदलण्याचं त्यांचं धोरण आहे अशा शब्दात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

भाजपाचं स्पष्टीकरण

विरोधकांच्या टीकेनंतर भाजपाने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. कर्नाटक भाजपाने याबाबत ट्विट करून अनंत कुमार हेगडे यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. हेगडे यांचं हे वैयक्तिक मत आहे. त्यांच्याकडून पक्षाने स्पष्टीकरण मागवलं आहे. भाजपाने नेहमी संविधानिक लोकहित आणि राष्ट्रीय हितासाठी काम केले आहे असं भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितले. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी