शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:03 IST

इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय काय आयात करतो भारत?

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या दोन्ही देशांतील वाढत्या तणावानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. एवढेच नाही तर, इस्रायलच्याइराणवरील हल्ल्याचा शेअर बाजारावरही वाईट परिणाम झाला आहे आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये स्वाहा झाले आहेत. हे युद्ध आणखी वाढण्याची आणि लांबण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरातील देशांचे टेन्शन वाढले आहे. 

इराण आणि इस्रायल युद्ध लांबल्यास पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होईल. यामुळे अनेक वस्तूंच्या अथवा गोष्टींच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊया, अशा परिस्थितीत मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा आणि इस्रायल-इराण यांच्यातील युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल? भारत या दोन्ही देशांकडून कोण कोणत्या गोष्टींची आयात करतो आणि कोणत्या गोष्टींच्या किंमती वाढू शकता? इस्रायलकडून कोण कोणत्या वस्तू आयात करतो भारत? -भारत आणि इस्रायल यांच्यात दीर्घकाळापासून चांगले व्यापारी संबंध आहेत. आकडेवारीसंदर्भात बोलायचे झाल्यास, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने इस्रायलला २.१ अब्ज डॉलर्सच्या वस्तू निर्यात केल्या आहेत. तर १.६ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत. भारत संरक्षण क्षेत्राशी संबंधित बहुतेक वस्तू इस्रायलकडून आयात करतो. महत्वाचे म्हणजे, इस्रायल हा भारताचा ३२ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारत इस्रायलकडून रडार, सर्व्हिलांन्स, लढाऊ ड्रोन, क्षेपणास्त्रे यांसह लष्करी हार्डवेअर आयात करतो. याशिवाय मोती, मौल्यवान दगड, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, खते, रासायनिक उत्पादने देखील आयात केली जातात.

इराणकडून काय काय आयात करतो भारत? -आर्थिक वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने इराणला १.२ अब्ज डॉलर्सची निर्यात केली असून ४४१.९ दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत. भारत इराणमधून कच्चे तेल, सुका मेवा, केमिकल्स, काचेची भांडी आयात करतो. याशिवाय, बासमती तांदूळ, चहा, कॉफी आणि साखर निर्यात केली जाते.या वस्तूंच्या किंमती वाढणार -तज्ज्ञांच्या मते, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते, यामुळे संपूर्ण पुरवठा साखळीच प्रभावित होईल. परिणामी आयात-निर्यात महाग होईल. याशिवाय, विमान भाडे देखील वाढू शकते. खरे तर, पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने, भारतीय विमान कंपन्या आखाती देशांकडून प्रवास करतात. युद्धादरम्यान, या विमान कंपन्यांना दुसरा मार्गही शोधावा लागेल.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धIndiaभारत