आमच्या सैनिकांवर हल्ले झाले तर यापुढे पाकिस्तानला असेच उत्तर मिळेल - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 16:53 IST2017-12-26T16:50:52+5:302017-12-26T16:53:41+5:30

भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकिस्तानी लष्कराविरोधात केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

If our soldiers are attacked, then Pakistan will get the same answer - Devendra Fadnavis | आमच्या सैनिकांवर हल्ले झाले तर यापुढे पाकिस्तानला असेच उत्तर मिळेल - देवेंद्र फडणवीस

आमच्या सैनिकांवर हल्ले झाले तर यापुढे पाकिस्तानला असेच उत्तर मिळेल - देवेंद्र फडणवीस

ठळक मुद्देभारतीय लष्कराच्या जवानांनी सोमवारी रात्री पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून स्पेशल ऑपरेशन केले. पाकिस्तानच्या गोळीबारात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाले होते.

अहमदाबाद - भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकिस्तानी लष्कराविरोधात केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भारत एक कमकुवत देश नाहीय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण जगाला दाखवून दिलयं. आपल लष्कर आधीपासूनच सामर्थ्यशाली आहे पण निर्णय घेताना राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीच राजकीय इच्छाशक्ती सर्जिकल स्ट्राईक असो किंवा डोकलामच्या विषयात दाखवून दिली असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमच्या सैन्याने आज जे केले त्याचा अभिमान आहेच. यापुढे आमच्या सैनिकांवर हल्ले झाले तर अशाच प्रकारचे उत्तर मिळेल असे देवेंद्र  फडणवीस यांनी सांगितले. 

भारतीय लष्कराच्या जवानांनी सोमवारी रात्री पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून स्पेशल ऑपरेशन केले.  भारताच्या या कारवाईत पाकिस्तानचे चार सैनिक ठार झाले. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी परिसरात प्रवेश केल्यानंतर त्याठिकाणी गस्तीवर असलेल्या चार पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. 

शनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह दोन जवान शहीद झाले होते. भारताने सोमवारी याच हल्ल्याचा हिशोब चुकता केला. भारत या कारवाईला सर्जिकल स्ट्राईकचे नाव देत नसला तरी ही कारवाई सर्जिकल स्ट्राईक सारखीच होती. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार लष्कराने या कारवाईत अनेक पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्या. 

शनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात एक मेजर आणि दोन जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने आम्ही या नापाक कारवाईला उत्तर देऊ. वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू असे स्पष्ट केले होते. भारतीय लष्कराच्या या कारवाईत चार पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची शक्यता आहे. भारतीय सैन्य नियंत्रण रेषा ओलांडून 500 मीटर आतपर्यंत घुसले होते. भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोटके पेरुन पाकिस्तानी सैनिकांना जाळयात अडकवण्याचा ट्रॅप रचला होता. त्यानंतर लाईट मशिनगमधून फायरिंग केली त्यात चार सैनिक ठार झाले. जवळपास 45 मिनिटे ही कारवाई सुरु होती असे वृत्त इंडियाने टुडेने दिले आहे. स्थानिक कमांडरने परिस्थितीनुसार थेट पीओकेमध्ये घुसून ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला असे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: If our soldiers are attacked, then Pakistan will get the same answer - Devendra Fadnavis