विरोधकांनी कोणतेही वाद उकरले तरी आम्हीच जिंकणार; अमित शहांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 03:50 IST2018-09-12T03:50:34+5:302018-09-12T03:50:51+5:30
गेल्या निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अकलाकचा मृत्यू आणि ‘अवॉर्ड वापसी’ यासारखे बिनबुडाचे वाद उपस्थित केले.

विरोधकांनी कोणतेही वाद उकरले तरी आम्हीच जिंकणार; अमित शहांचा दावा
जयपूर : गेल्या निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अकलाकचा मृत्यू आणि ‘अवॉर्ड वापसी’ यासारखे बिनबुडाचे वाद उपस्थित केले. आता पुन्हा निवडणुका तोंडावर असताना विरोधक पुन्हा असेच काही नवे वाद उकरून काढतील; परंतु त्याने काही फरक पडणार नाही. प्रत्येक निवडणुकीत आम्हीच जिंकणार हे ठरलेले आहे, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.
हिंदीत बोलताना ते म्हणाले की, अकलाक हुआ तब भी जिते थे, अवॉर्ड वापसी हुई तब भी जिते थे. अब वे कुछ नया करेंगे तोभी हम जितेंगे.
(वृत्तसंस्था)
> एकाही बांगलादेशी घुसखोरास थारा नाही
दहशतवादी कृत्यांमध्ये बळी पडणाऱ्या गोरगरिबांनाही मानवी हक्क असतात हे ते विसरतात. कोणीही कितीही विरोध केला तरी एकही बांगलादेशी घुसखोर देशात राहू न देण्याचा भाजपचा दृढसंकल्प आहे. आम्ही एकेकाला शोधून काढून देशाबाहेर काढू, असेही त्यांनी जाहीर केले.