शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 06:34 IST

सरन्यायाधीश बी. आर. गवई व न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू केली.

नवी दिल्ली : कायद्याच्या बाजूने संवैधानिकतेला गृहीत धरण्याची गरज अधोरेखित करून सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांना म्हटले आहे की, अंतरिम दिलासा देण्यासाठी मजबूत व स्पष्ट खटल्याची आवश्यकता आहे.

सरन्यायाधीश बी. आर. गवई व न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू केली. अंतरिम दिलासा देण्यासाठीच्या तीन मुद्द्यांत न्यायालयाकडून वक्फ, वक्फ-बाय-यूजर किंवा वक्फ बाय डीड घोषित संपत्तींना गैर-अधिसूचित करण्याच्या अधिकाराचा समावेश आहे. प्रत्येक कायद्याच्या बाजूने संवैधानिकतेची स्थिती असते. अंतरिम दिलासा देण्यासाठी तुम्हाला एक अतिशय मजबूत व स्पष्ट मुद्दा तयार करावा लागेल, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे की, हा कायदा म्हणजे ऐतिहासिक कायदेशीर आणि संवैधानिक तत्त्वांपासून दूर जाणे आहे. तसेच न्यायिक प्रक्रियेशिवाय वक्फ हस्तगत करण्याचे हे साधन केले आहे.

अंतरिम आदेश देण्यासाठी सुनावणी तीन चिन्हांकित मुद्द्यांपर्यंत मर्यादित ठेवावी, असा आग्रह केंद्राने धरला. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल व अभिषेक एम. सिंघवी यांनी याला विरोध केला. ते म्हणाले की, याची तुकड्यांमध्ये सुनावणी होऊ शकत नाही. हा वक्फ मालमत्ता पद्धतशीर हस्तगत करण्याबाबतचा खटला आहे. कोणते मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात, हे सरकार ठरवू शकत नाही. सुधारित कायदा योग्य न्यायालयीन प्रक्रिया बाजूला सारून वक्फ मालमत्ता पद्धतशीरपणे बळकावण्यास मदत करतो. त्याचबरोबर वक्फ मालमत्ता गैर-वक्फ होऊ शकतात, असे कपिल सिब्बल म्हणाले.

तीन चिन्हांकित मुद्द्यांपर्यंत सुनावणी मर्यादित ठेवावी : केंद्र सरकारची विनंती -अधिनियमाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतरिम आदेश देण्यासाठी सुनावणी तीन चिन्हांकित मुद्द्यांपर्यंत मर्यादित ठेवावी, असा आग्रह केंद्र सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी धरला. पहिला मुद्दा न्यायालयाकडून वक्फ, वक्फ-बाय-यूजर किंवा वक्फ बाय डीड घोषित संपत्तींना गैर-अधिसूचित करण्याच्या अधिकारचा आहे. दुसरा मुद्दा राज्य वक्फ बोर्ड व केंद्रीय वक्फ परिषदेच्या संरचनेशी संबंधित आहे. तिसरा मुद्दा तरतुदीशी संबंधित आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयwaqf board amendment billवक्फ बोर्डCourtन्यायालय