शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

हिटलरकडे गोबेल्स होता, तसे मोदींकडे रविशंकर प्रसाद; काँग्रेसची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 4:43 PM

केंब्रिज अॅनॅलिटिक्सप्रकरणावरून काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये आरोपप्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. एकीकडे केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद काँग्रेसवर एकामागोमाग एक आरोप करत आहेत, तर काँग्रेसकडूनही त्याला तातडीने प्रत्युत्तर दिले जात आहे.

नवी दिल्ली -  केंब्रिज अॅनॅलिटिक्सप्रकरणावरून काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये आरोपप्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. एकीकडे केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद काँग्रेसवर एकामागोमाग एक आरोप करत आहेत, तर काँग्रेसकडूनही त्याला तातडीने प्रत्युत्तर दिले जात आहे. आज रविशंकर प्रसाद यांनी केंब्रिज अॅनॅलिटिक्समध्ये काँग्रेसचा आरोप पुन्हा एकदा केल्यानंतर काँग्रेसने रविशंकर प्रसाद हे नरेंद्र मोदींचे गोबेल्स असल्याची बोचरी टीका केली आहे.  रविशंकर प्रसाद यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, हिटलरकडे गोबेल्स होता. तर नरेंद्र मोदींकडे रविशंकर प्रसाद आहेत. भाजपा सरकारकडून खोट्या बातम्या पेरण्यात येत आहेत. या प्रकरणी सगळ्यात मोठे चोरच सर्वाधिक आरडाओरडा करत आहेत," त्याआधी मोदी सरकारमधील अजून एक मंत्री मुख्यात अब्बास नक्वी यांनी  राहुल गांधीच्या समजुतदारपणावर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले की, राहुल गांधी यांची अक्कल पायत आहे का?  एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, राहुल गांधी यांची अक्कल पायत आहे का? त्यांनी विचार करायला हवा. डेटाचोरी सारखा गंभीर आपराध निरपराध भारतीयांसोबत जोडला आहे. जर डेटा चोरीमध्ये जे लोक असतील त्यांना सर्वांसमोर आणलं गेलं पाहिजे. काय म्हणाले होते राहुल - राहुल गांधींनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, इराकमध्ये 39 भारतीयांच्या झालेल्या हत्येवरून लक्ष विचलित करण्यासाठीच फेसबुकच्या डेटा लीकची गोष्ट समोर आणली गेली आहे. इराकमध्ये 39 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. सरकारचा खोटेपणा उघड झाल्यानं ते अडचणीत सापडले आहेत. सरकारनं यातून स्वतःचा बचाव करायचा असल्यानं काँग्रेसचा फेसबुक डेटा लीक प्रकरणात हात असल्याचा आरोप केला आहे.  काय आहे डेटा चोरी प्रकरण -    2013 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठामधील रिसर्चर अलेक्झांडर कोगनने पर्सनॅलिटी क्विझ अॅप तयार केला. या अॅपचा जवळपास 3 लाख लोकांनी वापर केला. त्यांनी स्वतःची तसेच मित्रांची खासगी माहिती या अॅपवर शेअर केली. 2014 मध्ये फेसबुकने धोरणात बदल केला. आता कोगनच्या अॅपवर मित्रांची माहिती शेअर करता येणार नव्हती. यासाठी मित्राकडेही ते अॅप असणे बंधनकारक झाले. 2015 मध्ये कोगनने या अॅपद्वारे मिळालेली माहिती 'केम्ब्रिज अॅनालिटिका'ला दिल्याचे समोर आले. हा प्रकार नियमांचं उल्लंघन करणारा होता यानंतर आम्ही तातडीने कोगनच्या अॅपवर बंदी आणण्यात आली. तसेच कोगन आणि केम्ब्रिज अॅनालिटिकानेही त्यांना मिळालेला डेटा डिलीट करावा, अशी सूचना केली. त्यांनी डेटा डिलीट केला नाही, हे गेल्या आठवड्यात समोर आल्यानंतर आम्ही केम्ब्रिज अॅनालिटिकावरही बंदी घातली, असे त्यांनी सांगितले. मार्क झुकेरबर्गने केली चूक मान्य - फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी डेटा चोरीप्रकरणी फेसबुकवर एक पोस्ट लिहीत मौन सोडलं होतं. डेटा चोरी प्रकरणात कंपनीकडून आतापर्यंत अनेक पावलं उचलण्यात आली आहेत आणि यापुढेही कठोर पावलं उचलली जातील. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, असे आश्वासन देत झुकेरबर्ग यांनी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणात झालेली आपली चूक मान्य केली आहे. झुकेरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं आमची जबाबदारी आहे. जर आम्ही यामध्ये अपयशी ठरत असू तर ही आमची चूक आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्ही अनेक पाऊलं उचलली होती, आमच्याकडून अनेक चुकाही झाल्या आहेत. या चुका सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मी फेसबुकचा संस्थापक आहे, त्यामुळे फेसबुक संबंधित कोणतीही चुकीची गोष्ट होत असेल तर त्यास मी जबाबदार आहे. झालेल्या प्रकरणांतून आम्ही आमच्या चुका जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहू आणि पुन्हा तुमचा विश्वास संपादीत करू. 

टॅग्स :FacebookफेसबुकBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण