शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

एफ-१६ विमाने घेतल्यास आर्थिक निर्बंध नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 4:29 AM

तुम्ही आमच्याकडून एफ-१६ पद्धतीची लढाऊ विमाने विकत घेतल्यास आम्ही तुमच्यावर आर्थिक निर्बंध घालणार नाही, अशी आॅफर अमेरिकेतर्फे भारताला देण्यात आली होती

नवी दिल्ली : तुम्ही आमच्याकडून एफ-१६ पद्धतीची लढाऊ विमाने विकत घेतल्यास आम्ही तुमच्यावर आर्थिक निर्बंध घालणार नाही, अशी आॅफर अमेरिकेतर्फे भारताला देण्यात आली होती; पण ती भारताने नाकारली असल्याचे समजते. भारताने रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्रे विकत घेतल्याने अमेरिका भारतावर आर्थिक निर्बंध घालण्याच्या विचारात आहे.रशियाकडून ही क्षेपणास्त्रे विकत घेण्याचा करार भारताने केल्यानंतर लगेचच अमेरिकेतर्फे एफ-१६ व एफ-१८ पद्धतीची अत्याधुनिक लढाऊ विमाने घेण्यासाठी आॅफर देण्यात आली होती. अर्थातच ही अधिकृत आॅफर नव्हती, तर केवळ तसे सुचविण्यात आले होते; पण ती घेतल्यास अमेरिका तुमच्यावर आर्थिक निर्बंध घालणार नाही, असेही सांगितल्यामुळे ती केवळ आॅफरच नव्हे, तर एका अर्थाने धमकीच होती.पाकिस्तानला अमेरिकेने यापूर्वीच एफ-१६ विमाने दिली आहेत. त्यामुळे भारताला ती नको आहेत. त्यातील अत्याधुनिक दर्जाची विमाने देण्याची आणि भारतात त्यांचे उत्पादन करण्यासाठी भागीदारीची तयारीही अमेरिकेने दर्शवली होती. पण रशियाकडून घेण्यात येणाऱ्या एस-४00 क्षेपणास्त्रांना ती पूरक नसल्याचे भारताचे म्हणणे आहे. त्यामुळे भारताने ती विकत घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले.रशियाशी क्षेपणास्त्रांबाबत झालेला करार आणि इराणकडून होणारी क्रूड आॅईलची खरेदी यामुळे अमेरिका सध्या भारतावर नाराज असून, त्यामुळेच तेथील कॅटसा या कायद्याच्या आधारे आर्थिक निर्बंधांची भाषा करीत आहे. रशिया व इराणशी भारताने कोणतेही करार करू नयेत, यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव आणू पाहत आहेत. भारताकडून रशियाला कोणत्याही प्रकारे पैसा मिळू नये, असा त्यांचा प्रयत्न आहे.>सीतारामन यांचा दौराअमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस हे मात्र भारतावर आर्थिक निर्बंध घालण्याच्या विरोधात आहेत.संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन डिसेंबर महिन्यात अमेरिकेला जाणार आहेत. त्या तिथे मॅटिस यांची भेट घेतील, असे सांगण्यात येते. मात्र, मॅटिस यांच्या भारत समर्थनाच्या भूमिकेमुळे ते तेव्हापर्यंत संरक्षणमंत्रीपदी राहतील का, याविषयी साशंकता आहे.