शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आज निवडणुका झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपाची उडणार दाणादाण, मिळतील केवळ एवढ्या जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 17:59 IST

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या महाआघाडीमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लखनौ -   बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या महाआघाडीमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका झाल्यास उत्तर प्रदेशात  भाजपाची दाणादाण उडण्याची शक्यता असून, राज्यातील 90 जागांपैकी भाजपाला केवळ 25 जागा मिळतील तर सपा-बसपा यांच्या आघाडीला 51 जागा मिळतील असा अंदाज एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेमध्ये वर्तवण्यात आला आहे. या सर्वेनुसार काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेनुसार उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल विभागातील 21 जागांपैकी भाजपाला 6 तर सपा-बसपा आघाडीला 15 जागा मिळतील. मात्र या विभागात काँग्रेसला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. अवध विभागात 18 जागांपैकी भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागेल. तर सपा-बसपाला 13 आणि काँग्रेसला दोन जागा मिळतील.पश्चिम उत्तर प्रदेशमध्येही सपा-बसपा आघाडीचाच जोर दिसून येण्याची शक्यता आहे. येथील 26 जागांपैकी भाजपाला केवळ 10 तर सपा आणि बसपाला 15 जागा मिळतील. या प्रदेशाता काँग्रेसच्या खात्यातही एक जागा जाण्याची शक्यता आहे. तर बुंदेलखंड विभागातील 15 जागांपैकी भाजपाल 6, सपा-बसपा आघाडीला 8 आणि काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये एनडीएचीच बाजीएकीकडे उत्तर प्रदेशात भाजपाला जबर नुकसान होत असताना बिहारमध्ये मात्र एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता या सर्व्हेमधून वर्तवण्यात आली आहे. बिहारमधील 40 जागांपैकी एनडीएला 35 तर यूपीएला केवळ 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये एनडीएमध्ये भाजपा, नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीचा समावेश आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी