शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

काँग्रेस सत्तेत आली तर 370 वर पुनर्विचार करू, पाकिस्तानी पत्रकाराशी दिग्विजय यांची चर्चा; भाजपचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 12:54 IST

केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्र शासित प्रदेशांत विभाजनही केले आहे.

नवी दिल्ली - भजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह (Digvijay singh) यांची एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. हा ऑडिओ क्लबहाउस चॅटचा आहे. यात दिग्विजय सिंह आर्टिकल-370 संदर्भात बोलत आहेत. या ऑडिओमध्ये, जर काँग्रेस सत्तेत आली तर आर्टिकल 370 हटविण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार केला जाईल, असे दिग्विजय सिंह बोलताना असल्याचे ऐकू येत आहे. (If Congress comes to power reconsider 370, Digvijay singh's discussion with Pakistani journalist, BJP's claim)

केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्र शासित प्रदेशांत विभाजनही केले आहे.

अमित मालवीय ( Amit Malviya) यांनी दावा केला आहे, की या चॅटमध्ये पाकिस्तानी पत्रकारही होते. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, "क्लबहाउस चॅटमध्ये राहुल गांधींच्या जवळचे नेते दिग्विजय सिंह पाकिस्तानी पत्रकाराला बोलत आहेत, जर काँग्रेस सत्तेत आली, तर आर्टिकल 370 हटविण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार केला जाईल. खरच? हीच तर पाकिस्तानची इच्छा आहे..."

" जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील"

नेमकं काय बोलतायत दिग्विजय सिंह? ऑडिओमध्ये काय ऐकायला येतंय? -या चॅटमध्ये दिग्विजय सिंह बोलताना ऐकू येत आहे, की "त्यांनी जेव्हा काश्मीरचे आर्टिकल 370 हटविले, तेव्हा तेथे लोकशाही नव्हती. तेथे मानवताही नव्हती, कारण सर्वांनाच कारागृहात डांबण्यात आले होते. काश्मिरियत्व तेथील धर्मनिरपेक्षतेचा भाग आहे. कारण मुस्लीम बहूल राज्याचा राजा हिंदू होता आणि दोघेही सोबतीने काम करत होते. एवढेच नाही, तर काश्मिरात कश्मिरी पंडितांना सरकारी नौकरीत आरक्षणही देण्यात आले होते. अशात आर्टिकल 370 हटविण्याचा निर्णय अत्यंत वाईट होता आणि जेव्हा काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा 370 हटविण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार केला जाईल."

दिग्विजय यांच्या ऑडिओनंतर भाजप आक्रमक - दिग्विजय यांची ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. बेगूसरायमधील भाजपचे खासदार तथा केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ट्विट करत काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले आहे, "पाकिस्तान हे काँग्रेसचे पहिले प्रेम आहे. दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींचाच मेसेज पाकिस्तानपर्यंत पोहोचवला आहे. काश्मीर बळकावण्यात काँग्रेस पाकिस्तानची मदत करेल.

टॅग्स :Article 370कलम 370Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर