प्रॉपर्टी मिळाल्यानंतर मुलांनी आई वडिलांची देखभाल न केल्यास मालमत्ता होणार परत, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 17:26 IST2025-01-04T17:25:32+5:302025-01-04T17:26:35+5:30
Supreme Court News: वृद्ध आई-वडिलांकडून मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्यानंतर किंवा भेट म्हणून अशी मालमत्ता मिळवल्यानंतर आई वडिलांना सोडून देणाऱ्या मुलांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

प्रॉपर्टी मिळाल्यानंतर मुलांनी आई वडिलांची देखभाल न केल्यास मालमत्ता होणार परत, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
वृद्ध आई-वडिलांकडून मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्यानंतर किंवा भेट म्हणून अशी मालमत्ता मिळवल्यानंतर आई वडिलांना सोडून देणाऱ्या मुलांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. आई-वडिलांकडून मालमत्ता नावावर करू घेतल्यावर किंवा त्यांच्याकडून भेट मिळवल्यानंतर आई-वडिलांना दूर लोटल्यास अशा मुलांना त्यांना मिळालेली मालमत्ता किंवा भेट परत करावी लागेल, असे आदेश सरर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशांमुळे वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ मुलांना कोणत्याही परिस्थितीत करावा लागेल, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आई-वडिलांकडून मातमत्ता नावावर करून घेऊन किंवा भेट म्हणून मिळवून नंतर त्यांना वाऱ्यावर सोडणं मुलांना महागात पडू शकतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितले की, जर मुलं आई-वडिलांची देखभाल करण्यात अपयशी ठरली तर आई-वडिलांनी त्यांना जी मालमत्ता भेट म्हणून दिली आहे, ती मालमत्ता ज्येष्ठ नागरिकांचं पालन-पोषण आणि कल्याण कायद्यांतर्गत रद्द करता येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने वृद्धांबाबत हल्लीच हा महत्त्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. त्यामुळे वृद्धांना खूप फायदा होणार आहे. या निर्णयामुळे आता मुले आई वडिलांची काळजी घेऊन त्यांच्यासोबत चांगलं वागतील, अशी अपेक्षा केली जात आहे.