"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 01:44 PM2020-07-23T13:44:07+5:302020-07-23T13:53:16+5:30

"व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही, त्यांनी काही चुकीचे केले असते, तर मीच माफीची मागणी केली असती"

"If Chhatrapati Shivaji Maharaj had been insulted, he would have resigned immediately." - udayanraje bhosale | "छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

googlenewsNext
ठळक मुद्दे"व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही, त्यांनी काही चुकीचे केले असते, तर मीच माफीची मागणी केली असती"

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही, अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार आणि भाजपा नेते उदयनराजे भासले यांनी दिली आहे.

राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेवरुन सुरु झालेल्या राजकारणावर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शपथविधीवेळी काय घडले, यासंदर्भात सांगितले. "सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही, त्याला घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता", असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

याचबरोबर, व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही. त्यांनी काही चुकीचे केले असते, तर मीच माफीची मागणी केली असती, असे उदयनराजे भोसले म्हणाले. याशिवाय, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झाले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका. जे घडले नाही ते घडल्याचं भासवण्याचा प्रयत्न करु नका, माझी हात जोडून विनंती आहे, राजकारण करु नका, असे उदयनराजे भोसले म्हणाले. 

दरम्यान, भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी खासदारकीची शपथ घेतली. यावेळी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली. त्यावरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.   

आणखी बातम्या...

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही, याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे?"

बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्... 

राम मंदिराचे भूमिपूजन अशुभ मुर्हूतावर? शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींकडून प्रश्नचिन्ह    

जोपर्यंत शाळा बंद आहेत, तोपर्यंत फी नाही; गुजरात सरकारचा पालकांना दिलासा    

मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान

चीनविरोधात जागतिक आघाडी, अमेरिकेने घेतली अशी भूमिका    

"मी म्हणजे ट्रम्प नाही..." उद्धव ठाकरेंच्या अनलॉक मुलाखतीचा प्रोमो रिलीज    

Read in English

Web Title: "If Chhatrapati Shivaji Maharaj had been insulted, he would have resigned immediately." - udayanraje bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.