राम मंदिराचे भूमिपूजन अशुभ मुर्हूतावर? शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींकडून प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 09:19 AM2020-07-23T09:19:01+5:302020-07-23T09:32:58+5:30

राम मंदिराच्या पायाभरणीच्या मुहूर्तावर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Bhumi Pujan of Ram temple on inauspicious moment? Question presented by Shankaracharya Swaroopanand Saraswati | राम मंदिराचे भूमिपूजन अशुभ मुर्हूतावर? शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींकडून प्रश्नचिन्ह

राम मंदिराचे भूमिपूजन अशुभ मुर्हूतावर? शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींकडून प्रश्नचिन्ह

Next
ठळक मुद्देया विषयावर चर्चा करण्यासाठी अयोध्येतील साधू-संतांनी थेट शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराजांना आव्हान दिले आहे.

नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी 5 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी 12 वाजता पूजा करून मंदिर बांधणीसाठी पायाभरणी करतील. पण, या भूमिपूजनाच्या मुहूर्तावरून वादाला तोंड फुटले आहे.

राम मंदिराच्या पायाभरणीच्या मुहूर्तावर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी भूमिपूजनाचा मुहूर्त अशुभ असल्याचे म्हटले आहे. तसेच, मंदिराच्या बांधकामासाठी जनतेचे मत घ्यावे, अशी मागणीही शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी केली आहे.

"आम्ही रामभक्त आहोत, राम मंदिर बांधण्यात आम्हाला आनंद होईल, परंतु त्यासाठी योग्य तारीख व शुभ मुहूर्त असावा", असे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी म्हटले आहे. याशिवाय, राम मंदिर सार्वजनिक पैशाने बांधायचे आहे, तेव्हा मंदिराचे मॉडेल कसे असावे याबद्दलही जनतेचे मत घेतले पाहिजे, असे स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी असेही म्हटले आहे. तसेच, राम मंदिर कंबोडियातील अंगकोर वॅटसारखे विशाल आणि भव्य असावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या विषयावर चर्चा करण्यासाठी अयोध्येतील साधू-संतांनी थेट शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराजांना आव्हान दिले आहे. जर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती महाराजांना हनुमान चालीसा ते ऋग्वेदपर्यंत ज्ञान असल्यास, त्यांनी याठिकाणी येऊन 5 ऑगस्ट रोजी भूमीपूजन करणे चुकीचे आहे, हे सिद्ध करावे, असे म्हटले आहे.

दरम्यान, राम मंदिराच्या नवीन मॉडेलची रचनाही समोर आली आहे. त्यात बरेच बदल केले गेले आहेत. आता राम मंदिर 3 मजल्यांचे असेल, ज्याची लांबी 268 फूट आणि रुंदी 140 फूट असेल, तर मंदिराची उंची 161 फूट असेल. गर्भगृह, सिंहद्वार, अग्रभाग, नृत्य मंडप आणि रंग मंडपात कोणताही बदल करण्यात येणार नाही.

आणखी बातम्या...

जोपर्यंत शाळा बंद आहेत, तोपर्यंत फी नाही; गुजरात सरकारचा पालकांना दिलासा    

मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान

नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक, ट्रॅकवर उतरून गोंधळ

चीनविरोधात जागतिक आघाडी, अमेरिकेने घेतली अशी भूमिका    

"मी म्हणजे ट्रम्प नाही..." उद्धव ठाकरेंच्या अनलॉक मुलाखतीचा प्रोमो रिलीज    

"बंदीचे कठोर पालन करा, अन्यथा....", मोदी सरकारचा चिनी अ‍ॅप्स कंपन्यांना इशारा

Web Title: Bhumi Pujan of Ram temple on inauspicious moment? Question presented by Shankaracharya Swaroopanand Saraswati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.