शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कर्नाटकमध्ये भाजपा जिंकला तर मला असुरक्षित वाटेल - प्रकाश राज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 18:16 IST

कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला तर या राज्यात राहणे मला असुरक्षित वाटेल, अशी भीती प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी व्यक्त केले आहे. 

म्हैसूर - पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे कर्नाटकमधील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपा व जनता दल सेक्युलर या विरोधी पक्षांमध्ये कर्नाटकची निवडणुक जिंकण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यादरम्यान, कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला तर या राज्यात राहणे मला असुरक्षित वाटेल, अशी भीती प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी व्यक्त केले आहे.  आपल्या राज्यातील भीती व्यक्त करताना प्रकाश राज म्हणले, गुलबर्गा येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्यावर आणि माझ्या कारवर दगडफेक झाली. अशा परिस्थितीत जर राज्यात भाजपाची सत्ता आली तर मी या राज्यात राहणे असुरक्षित समजेन. तसेच दिवसेंदिवस माझ्या मनातील भीती वाढत जात आहे." यावेळी भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या कल्पनेलाही प्रकाश राज यांनी विरोध केला. असे करणे म्हणजे कुठल्यातरी कावळ्याला राष्ट्रीय पक्षी बनवण्यासारखे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. "जर बहुसंख्याक असणे हाच निकष असेल आणि याच आधारावर हिंदुराष्ट्र बनवण्याची मागणी होत असेल तर या देशात मोरांपेक्षा कावळ्यांची संख्या अधिक आहे. त्याआधारावर मोराच्या जागी कावळ्यालाच राष्ट्रीय पक्षी घोषित करा, प्रकाश राज म्हणाले. केवळ बहुसंख्यकतेच्या आधारावर कुठल्याही समुहाला या राष्ट्राचे संपूर्ण प्रतिनिधी मानता येणार नाही, असेही ते म्हणाले. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते असलेले प्रकाश राज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे कट्टर विरोधक असून,  मोदी आणि अमित शाह यांना आपण हिंदू मानत नाही, असे विधान त्यांनी जानेवारी महिन्यात केले होते. मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य करताना ते म्हणाले होते की,  ते म्हणतात मी हिंदूविरोधी आहे, पण हे सत्य नाही, खरंतर मी मोदीविरोधी, हेगडेविरोधी आणि अमित शाहविरोधी आहे. ते हिंदू नाहीत.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकPrakash Rajप्रकाश राजBJPभाजपा