शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

Video: ...तर काश्मीरचे भारतातील विलीनीकरणही हंगामी, फारुख अब्दुल्ला बरळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 8:33 AM

"जे भारताला तोडण्याची भाषा करतील त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. तर  जे भारतासोबत राहू इच्छितात त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल.

नवी दिल्ली - काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हे जर अस्थायी स्वरूपाचे असेल तर काश्मीरचे भारतातील विलीनीकरण हेसुद्धा हंगामी स्वरूपाचे आहे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.  गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरबाबत  संसदेत केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना अब्दुल्ला यांनी हे विधान केले आहे.

"जे भारताला तोडण्याची भाषा करतील त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. तर  जे भारतासोबत राहू इच्छितात त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल. तसेच काश्मीरबाबतचे कलम 370 ही घटनेतील अस्थायी तरतूद आहे, असे अमित शहा यांनी संसदेत सांगितले होते. मात्र त्याला फारुख अब्दुल्ला यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दुल्ला यांनी सांगितले की," जर कलम 370 अस्थायी असेल तर आमचे.भारतातील विलीनीकरणही हंगामी आहे.

जम्मू-काश्मीरचे महाराज हरि सिंह यांनी जेव्हा जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण केले ते हंगामी स्वरूपाचे होते. या हंगामी विलीनीकरणासोबत कलम 370 हेसुद्धा हंगामी स्वरूपाचे होते. जम्मू-काश्मीरमध्ये जनमत संग्रह घेऊन तेथील लोकांना भारतात सामील व्हायचे आहे की पाकिस्तानमध्ये हे जाणून घेतले जाईल, असेही तेव्हा निश्चित करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत जनमतसंग्रह घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जनमतसंग्रहच झालेला नाही तर कलम 370 कसे काय हटवणार," असा सवालही त्यांनी केली. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीची मुदत अजून सहा महिन्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावास राज्यसभेने मंजुरी दिली आहे. तसेच काश्मीर विधानसभेसाठी या वर्षाच्या अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतAmit Shahअमित शहा