शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

26/11ची पुनरावृत्ती झाल्यास संयम राखणार नाही

By admin | Updated: June 11, 2014 01:15 IST

मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती झाल्यास आपण संयम बाळगणार नसल्याचे भारताने अमेरिकेला स्पष्टच सांगितले होते, अशी माहिती माजी अमेरिकी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी दिली.

मुंबई हल्ला : तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी हिलरी क्लिंटन यांना स्पष्टच सांगितले होते
वॉशिंग्टन : मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती झाल्यास आपण संयम बाळगणार नसल्याचे भारताने अमेरिकेला स्पष्टच सांगितले होते, अशी माहिती माजी अमेरिकी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी दिली. 
क्लिंटन यांनी ही माहिती ‘हॉर्ड चॉईसेस’ या त्यांच्या नव्या पुस्तकामध्ये दिली आहे. 2क्क्8 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला केला होता. क्लिंटन तेव्हा अमेरिकी परराष्ट्रमंत्री होत्या. या हल्ल्यानंतर क्लिंटन यांची तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली होती. या चर्चेत उभय नेत्यांनी दुसरा हल्ला झाल्यास आपणाकडून संयमाची अपेक्षा बाळगू नये, असे आपणास स्पष्ट सांगितले होते, असे क्लिंटन यांनी म्हटले आहे. मुंबई हल्ल्यानंतर सिंग यांनी पाकबाबत संयम दाखविणो किती कठीण बनले आहे, हे मला सांगितले होते.
पाकस्थित लष्कर ए तोयबा या संघटनेच्या दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2क्क्8 ला मुंबईतील अनेक ठिकाणी घातक हल्ला केला होता. यात 166 जण ठार झाले होते. मृतांत पाच अमेरिकी नागरिकांचाही समावेश होता. भारतीय या हल्ल्याला 26/11 असे संबोधतात. हा एक प्रकारे 9/11चा प्रतिध्वनी आहे. 9/11ला अमेरिकेत हल्ला होऊन वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारती भुईसपाट झाल्या होत्या. मुंबई हल्ल्यादरम्यान हॉटेल ताजमहल पॅलेसमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली होती. भारतीय नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी मी मुंबईतील याच हॉटेलमध्ये वास्तव्य केले, असे क्लिंटन यांनी या पुस्तकात लिहिले आहे. हे पुस्तक मंगळवारी बाजारात उपलब्ध होत आहे.  (वृत्तसंस्था)
 
 
‘आयएसआय’मुळे लादेनविरोधी मोहिमेची पाकला माहिती दिली नव्हती
-वॉशिंग्टन : पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयमधील काहीजणांचे अल-काईदा व तालिबानशी संबंध असल्याचे ठाऊक असल्याने अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार मारण्याच्या आपल्या गुप्त मोहिमेची माहिती पाक सरकारला दिली नव्हती, असे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे. 
-आमचे पाकसोबतचे संबंध आधीच खूप खराब झाले होते. पाक लष्कर आपल्या हवाई हद्दीत घुसखोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शांत बसले नसते. त्यामुळे पाकला सांगूनच ही मोहीम राबवावी जेणोकरून पुढील संभाव्य अनर्थ टळू शकेल, असाही एक मतप्रवाह होता. त्याचबरोबर पाकला न सांगता जर मोहीम राबवली तर संबंध एकदम तुटतील व त्याचा आपल्या अफगाण युद्धावर परिणाम होईल, असेही म्हटले जात होते. मात्र, आम्ही हा धोका पत्करला व अबोटाबादमध्ये लादेनला ठार मारले.