शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

लेहमध्ये बेपत्ता झालेले IES सुभान अली २५ दिवसांनंतरही गायबच, वडिलांचा सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 11:48 AM

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याची पाहणी करायला जात असताना त्यांच्या गाडीवरचं नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. त्यानंतर त्यांचा कोणताच थांगपत्ता लागलेला नाही.

नवी दिल्लीः भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES) अधिकारी सुभान अली 22 जूनपासून बेपत्ता झाले आहेत. ते सीमा रस्ते संघटनेत अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांची तैनाती लेह आणि कारगिलमध्ये करण्यात आली होती. 22 जून रोजी ते लान्सनायक पलविंदर सिंग यांच्यासमवेत भारत-चीन सीमेवर बांधल्या जात असलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी  गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याची पाहणी करायला जात असताना त्यांच्या गाडीवरचं नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. त्यानंतर त्यांचा कोणताच थांगपत्ता लागलेला नाही. आतापर्यंत त्यांचा मृतदेहसुद्धा सापडलेला नाही. त्यांचे कुटुंबीय त्यांची वाट पाहत आहेत. उत्तर प्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी सुभानचे कुटुंब खूपच अस्वस्थ आहे. ते प्रत्येक क्षणी भयंकर यातनांमधून जात आहेत. सुभान या जगात नाही, यावर त्यांचा विश्वास नाही. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असेल तर सरकारने त्यांचा मृतदेह आणावा, जेणेकरून आमच्या लोकांना खात्री पटेल, असे या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. जोपर्यंत ते जिवंत किंवा त्यांचा मृतदेह सापडत नाही, तोपर्यंत ते जिवंत असल्याचंच आम्ही समजू.सरकारच्या प्रयत्नांनी असमाधानीसुभानचे वडील रमझान अली यांनी आरोप केला की, सरकार सुभानला शोधण्यासाठी पुरेसे उपाय करीत नाही. केंद्र सरकारच्या प्रयत्नावर ते समाधानी नाहीत. या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रमजान अली म्हणतात की, जोपर्यंत ते आपल्या मुलाला जिवंत किंवा मृतदेह पाहत नाही, तोपर्यंत त्याचा श्वास अडकलेल्या अवस्थेत राहील. भावानं एनडीआरएफवर उपस्थित केले प्रश्नसुभानचा भाऊ शबन अली यांनी सांगितले की, सैन्य आणि लेह प्रशासन एकत्रितपणे 60 किमीच्या परिघात आपल्या भावाचा मृतदेह शोधू शकलेले नाहीत. ते म्हणाले की, जेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा ते लेह येथे गेले होते. एनडीआरएफच्या अधिका-यांची तिथे भेट घेतली. अधिका -यांनी त्यांना सांगितले की, अतिशीत तापमानात त्यांचा मृतदेह पाण्यात सापडणे फार कठीण जात आहे. एनडीआरएफ कठीण काळात काम करू शकत नसेल तर त्यांचा काय उपयोग?, असंही ते म्हणाले आहेत. सुभान अली कोण आहेत?बलरामपूरमधील जयनगर या छोट्याशा गावात राहणारे सुभान यांनी आयआयटी दिल्लीमधून इंजिनीअरिंग केले. IES प्रवेश परीक्षेत त्यांना भारतात 24वे स्थान मिळाले. 2018 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी आयआयटी दिल्लीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये एमटेक केले. त्यांना दिल्ली विकास प्राधिकरणात पोस्ट करण्यात आले होते. एप्रिलमध्ये त्यांना कारगिल भागात पाठवण्यात आले होते. ते येथील भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या बांधकामांचे काम पाहात होते.

हेही वाचा

रेकॉर्ड ब्रेक! डिझेलची किंमत पुन्हा भडकली, पेट्रोललाही मागे सोडलं

जिओनं दोन सर्वात स्वस्त प्लॅन केले बंद, लगेचच जाणून घ्या...  

उलवेत बनावट रॉयल्टी चलनप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल 

टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश

मोदी सरकारच्या 'या' योजनेतून थेट शेतकर्‍यांच्या खात्यात पाठविले जातात पैसे; जाणून घ्या सर्व काही

इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर

Rajasthan Political Crisis: मी खासदार झालो तेव्हा पायलट ३ वर्षांचे होते; पक्षाशी गद्दारी कधीही वाईटच, गेहलोतांचा थेट पलटवार

Rajasthan Political Crisis: काहीतरी गडबड आहे! बरंच काही सांगून जातंय वसुंधरा राजेंचं मौन

कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना