Rajasthan Political Crisis: मी खासदार झालो तेव्हा पायलट ३ वर्षांचे होते; पक्षाशी गद्दारी कधीही वाईटच, गेहलोतांचा थेट पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 01:01 PM2020-07-17T13:01:10+5:302020-07-17T13:01:47+5:30

Rajasthan Political Crisis: तुम्ही भाजपाबरोबर  मिळून आपलं सरकार पाडू इच्छिता, ही चांगली गोष्ट नाही. जनता अशा लोकांना कधीच माफ करणार नसल्याचंही गेहलोत म्हणाले आहेत. 

Rajasthan Political Crisis: cm gehlots direct attack on sachin pilot betrayal from the party is bad | Rajasthan Political Crisis: मी खासदार झालो तेव्हा पायलट ३ वर्षांचे होते; पक्षाशी गद्दारी कधीही वाईटच, गेहलोतांचा थेट पलटवार

Rajasthan Political Crisis: मी खासदार झालो तेव्हा पायलट ३ वर्षांचे होते; पक्षाशी गद्दारी कधीही वाईटच, गेहलोतांचा थेट पलटवार

Next

नवी दिल्लीः काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी सुरू असलेल्या संघर्षाबद्दल मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सचिन पायलट यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. घरातली भांडणं घरातच सोडवली जातात. जर घरची भांडणं घेऊन आपण विरोधकांशी जाऊन हातमिळवणी केली, तर लोकशाहीत काय उरते?, असा सवाल गेहलोतांनी उपस्थित केला आहे. महत्त्वाकांक्षी असणे वाईट गोष्ट नाही, परंतु अतिमहत्त्वाकांक्षी असणेही चांगली गोष्ट नाही. माझ्या मते, पक्षाशी विश्वासघात ही कधीही वाईट गोष्टच आहे. तुम्ही भाजपाबरोबर  मिळून आपलं सरकार पाडू इच्छिता, ही चांगली गोष्ट नाही. जनता अशा लोकांना कधीच माफ करणार नसल्याचंही गेहलोत म्हणाले आहेत. 

गेहलोत पुढे म्हणतात की, जेव्हा मला असे वाटेल की जनतेला मी नकोय, तेव्हा मी स्वत: हायकमांडशी बोलून मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडेन आणि तिथे कोणाला तरी दुसऱ्याला बसवेन. वसुंधरा राजे शिंदे आणि सचिन पायलट यांची भेट झाल्याचा आरोपही सीएम गेहलोत यांनी केला आहे. जर ते आजही घरी परत आले तर मी त्यांना मिठी मारेन. मी खासदार झालो तेव्हा पायलट ३ वर्षांचे होते, असे गेहलोत म्हणाले आहेत. आजही मी तुम्हाला एक मिठी मारेन. राजकारण ही वेगळी बाब आहे, परंतु तरीही मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. गेहलोत म्हणाले की, पूर्वी त्यांना भाजपामध्ये जायचे होते, पण कोणीही त्यांच्याबरोबर जाण्यास तयार नव्हते. यानंतर त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचा विचार केला आणि राजस्थानमध्ये कॉंग्रेस संपवण्याचा त्यांचा विचार होता. त्यांना असे वाटले की भाजपाबरोबर जाऊन सरकारे स्थापन झाली आहेत आणि ती पडलीही आहेत. मग मी सरकार का नाही बनवू शकत, असं त्यांना वाटत होतं.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये मी कोणालाही आव्हान देऊ शकत नाही, परंतु तुम्ही पक्षाचा विश्वासघात करू नये, असे ते म्हणाले. मी वयाच्या 28व्या वर्षी खासदार झालो. 29व्या वर्षांत केंद्रीय मंत्री झालो आणि 34व्या वर्षी प्रदेशाध्यक्ष झालो, तीन वेळा केंद्रीय मंत्री राहिलो आणि तिस-यांदा मुख्यमंत्री झालो. आमच्या पिढीनं खूप कष्ट केले होते. त्यावेळी बरेच संकट होते. इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती, तरीसुद्धा आम्ही पक्षाची इमानदारी राखली. तरुण नेते राजीव गांधी मारले गेले, तरीही आम्ही पक्षाशी निष्ठा कायम ठेवली. पदावर असू किंवा नसू, पण पक्षाची विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत राहिलो. 

गेहलोत म्हणाले की, पूर्वी राजकारणचं वय हे ६० वर्षं वर्षे असायचे, आता ते मागे पडले आहे.  म्हणून कनिष्ठ-वरिष्ठ चर्चा निरर्थक आहे. राजकारणात तरुण आले पाहिजेत, जसे आपण आलो आहोत. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, अहमद पटेल, मुकुल वासनिक, तारिक अन्वर असे अनेक तरुण त्यावेळी पहिल्यांदाच राजकारणात आले होते. आजही त्यांचं राजकारण जिवंत आहे. जर आपण राजकारण सोडलं तर काय करणार? इंदिरा गांधी जेव्हा निवडणूक हरल्या होत्या तेव्हा ते एक मोठे आव्हान होते, तरीही आम्ही डगमगलो नाही. आम्ही कोणतीही अडचण सहन करण्यास तयार आहोत. मी नेहमी तरुणाबद्दल बोलतो. राहुल गांधींना माहीत आहे की, जेव्हा जेव्हा पक्ष बैठक घेतो, तेव्हा मी प्रथम एनएसयूआयबद्दल बोलतो. तरुण हे भविष्य आहे, ते आपल्यापेक्षा चांगले कार्य करू शकतात. तरुणांनी कार्य केले पाहिजे. आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात की जे आपल्याला पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा इतर कोणत्याही पदासाठी दावा करण्यासाठी उकसावत असतात. परंतु या सर्वांच्यादरम्यान स्वतःकडे विचार करण्याची शक्ती असावी.
मुख्यमंत्री पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या परतीचा मार्ग आता कॉंग्रेसच्या नेतृत्वाने बंद केल्याची चर्चा आहे. गेहलोत आधी त्याचे नाव न घेता काहीही म्हणायचे, परंतु आता त्यांनी उघडपणे सचिन पायलट यांच्या नावाने आरोप केले आहेत. 

हेही वाचा

Rajasthan Political Crisis: काहीतरी गडबड आहे! बरंच काही सांगून जातंय वसुंधरा राजेंचं मौन

नशीब फळफळलं!...अन् ती महिला रातोरात झाली करोडपती

गेहलोत सरकार पाडण्याचं केंद्रातल्या मंत्र्यांचं षडयंत्र, त्यांना अटक करा- सुरजेवाला

CoronaVirus News : तंत्रज्ञानाचा आविष्कार! IIT मद्रास अन् स्टार्टअपनं मिळून बनवलं फोल्ड होणारं पोर्टेबल कोरोना रुग्णालय

खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा

CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क

कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना

Web Title: Rajasthan Political Crisis: cm gehlots direct attack on sachin pilot betrayal from the party is bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.