शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

दातृत्वाचा आदर्श; निवृत्त प्राध्यापिकेने दिली ९७ लाख रुपयांची देणगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 4:30 AM

कोलकाता शहरातील बागुईती या विभागातील फ्लॅटमध्ये त्या एकट्याच राहतात.

कोलकाता : दर महिना सुमारे ५० हजार रुपये निवृत्तीवेतन असलेल्या पश्चिम बंगालमधील माजी प्राध्यापक चित्रलेखा मलिक यांनी २००२ सालापासून आतापर्यंत सुमारे ९७ लाख रुपयांची देणगी राज्यातील विविध शिक्षणसंस्थांना दिली असून, दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे.कोलकाता शहरातील बागुईती या विभागातील फ्लॅटमध्ये त्या एकट्याच राहतात. ९७ लाख रुपये देणगीपैकी ५० लाख रुपये संशोधनातील माझे मार्गदर्शक पंडित बिधुभूषण भट्टाचार्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जादवपूर विद्यापीठाला गेल्या वर्षी दिले आहेत. या माहितीला विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.राजाबाजार भागातील व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटमध्ये त्या संस्कृतच्या अध्यापक होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पंडित बिधुभूषण भट्टाचार्य यांच्या पत्नी हेमावती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जादवपूर विद्यापीठाला ६ लाख रुपयांची स्वतंत्र देणगी दिली आहे.हावडा येथील इंडियन रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर इंटिग्रेटेड मेडिकल रिसर्च या संस्थेला चित्रलेखा मलिक यांनी ३१ लाख रुपयांची देणगी दिली. २००२ ते २०१८ या कालावधीत शिक्षणासाठी त्यांनी देणग्या दिल्या.आणखी दोन देणग्या देणार- निवृत्त प्राध्यापक चित्रलेखा मलिक म्हणाल्या की, आपल्या गरजा कमी करून साधे राहणीमान ठेवा, अशी शिकवण उपनिषदांनी दिली आहे. रोजच्या खर्चासाठी, जगण्यासाठी मला फार पैसे लागत नाहीत.त्यामुळे उरलेले पैसे मी दान करते. लोकोपयोगी कार्यासाठी नजीकच्या काळात त्या अजून दोन मोठ्या देणग्या देणार आहेत.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल