गंगाजलानं कोरोना ठीक होतो का पाहा; मोदी सरकारच्या सूचनेवर शास्त्रज्ञांचं 'सायंटिफिक' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 10:48 AM2020-05-08T10:48:14+5:302020-05-08T11:06:07+5:30

जल शक्ती मंत्रालयाचा प्रस्ताव आयसीएमआरनं फेटाळला

Icmr rejects modi governments proposal regarding Treatment Of Covid 19 Patients With Ganga Water kkg | गंगाजलानं कोरोना ठीक होतो का पाहा; मोदी सरकारच्या सूचनेवर शास्त्रज्ञांचं 'सायंटिफिक' उत्तर

गंगाजलानं कोरोना ठीक होतो का पाहा; मोदी सरकारच्या सूचनेवर शास्त्रज्ञांचं 'सायंटिफिक' उत्तर

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) जल शक्ती मंत्रालयाचा प्रस्ताव फेटाळला आहे. कोरोना विषाणूवरील उपचारात गंगाजल उपयोगी ठरू शकतं का, याबद्दल संशोधन करण्याचं आवाहन जल शक्ती मंत्रालयानं आयसीएमआरनं केलं होतं. मात्र अशा प्रकारच्या संशोधनासाठी शास्त्रीय आकडेवारीची आवश्यकता असल्याचं उत्तर देत आयसीएमआरनं जल शक्ती मंत्रालयाचा प्रस्ताव फेटाळून लावला.

कोरोनाची बाधा झालेल्यांवर उपचार करण्यासाठी गंगाजल फायदेशीर ठरू शकतं याची कोणतीही ठोस आणि अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे याबद्दल संशोधन करता येणार नाही, असं आयसीएमआरकडे येणाऱ्या संधोधन प्रस्तावांचं मूल्यांकन करणाऱ्या समितीचे प्रमुख डॉ. वाय. के गुप्ता यांनी सांगितलं. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी गंगाजलाचा वापर होऊ शकतो. त्यामुळे याबद्दल संशोधन करण्यात यावं, अशी मागणी जल शक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन'मध्ये काम करणाऱ्या अनेकांनी केली होती. 

'राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन'मध्ये काम करणाऱ्या अनेकांसह काही स्वयंसेवी संस्थांनीदेखील गंगाजलाच्या वैद्यकीय उपयोगाबद्दल संशोधन करण्याची मागणी केली होती. त्यामुळे जल शक्ती मंत्रालयानं याबद्दलचा प्रस्ताव आयसीएमआरकडे पाठवला. एखादं संशोधन सुरू करताना त्याच्याशी संबंधित आकडेवारी, तथ्यं, माहिती आवश्यक असते. त्याला वैज्ञानिक आधार असावा लागतो. त्यानंतर त्याच्यावर संशोधन करता येतं. आम्ही ही माहिती जल शक्ती मंत्रालयाला कळवली आहे, असं डॉ. वाय. के गुप्ता म्हणाले. गुप्ता यांनी याआधी एम्समध्ये अधिष्ठाता पदावर काम केलं आहे.

लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतून बचावलेल्या मजुराने सांगितलं नेमकं काय घडलं!

औरंगाबादमधील रेल्वे अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल; रेल्वे मंत्र्यांना दिल्या सूचना

Web Title: Icmr rejects modi governments proposal regarding Treatment Of Covid 19 Patients With Ganga Water kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.