आयएएस टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर अडकले विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 13:40 IST2018-04-09T13:40:25+5:302018-04-09T13:40:25+5:30

2015 च्या बॅचचे यूपीएससी टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांनी गेल्या शनिवारी काश्मीरमधील पहलगामध्ये विवाह केला. अहतर आमिर हे मूळचे काश्मीरमधील आहेत. 2015 मध्ये ते यूपीएससीमधील सेकंड टॉपर होते. 

IAS Topper Tina Dabi Weds Athar Aamir in Pahalgam | आयएएस टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर अडकले विवाहबंधनात

आयएएस टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर अडकले विवाहबंधनात

ठळक मुद्देटीना डाबी आणि अतहर आमिर अडकले विवाहबंधनातकाश्मीरमधील पहलगामध्ये केला विवाहआयएएसचे ट्रेनिंग सुरु असताना अडकले एकमेकांच्या प्रेमात

नवी दिल्ली : 2015 च्या बॅचचे यूपीएससी टॉपर टीना डाबी आणि अतहर  आमिर विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांनी गेल्या शनिवारी काश्मीरमधील पहलगामध्ये विवाह केला. अतहर आमिर हे मूळचे काश्मीरमधील आहेत. 2015 मध्ये ते यूपीएससीमधील सेकंड टॉपर होते. 
मिळालेल्या माहितीनुसार, टीना डाबी या विवाह सोहळ्यासाठी गेल्या शुक्रवारी रात्री आपल्या कुटुंबीयांसह काश्मीरमधील पहलगाममध्ये पोहोचली होती. टीना डाबी आणि अतहर आमिर यांच्या विवाहासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या बातम्यांनुसार, आयएएसचे ट्रेनिंग सुरु असताना टीना डाबी आणि अतहर आमिर एकमेकांच्या प्रेमात अडकले होते. 




टीना डाबीने याआधी फेसबुकच्या माध्यमातून दोघांच्या विवाहासंदर्भात माहिती दिली होती. यावेळी दोघांचे फोटो तिने फेसबुकवर शेअर केले होते. मात्र, लग्न कधी होणार आहे, ती तारीख तिने दिली नव्हती. दरम्यान, टीना डाबीने सांगितले की, काही लोकांनी आमच्या प्रेमाला विरोध करत धार्मिक टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रेम करणे गुन्हा आहे का, असा सवाल तिने यावेळी केला.  



 

Web Title: IAS Topper Tina Dabi Weds Athar Aamir in Pahalgam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न