IAS रिया डाबीचं IPS मनोज यांच्याशी लग्न; कुटुंबात आजोबांपासून सर्वजण सनदी अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:36 IST2024-02-28T14:34:41+5:302024-02-28T14:36:57+5:30
रिया डाबी आणि मनोज कुमार हे दोघेही युपीएससी स्पर्धेतून अधिकारी बनले आहेत.

IAS रिया डाबीचं IPS मनोज यांच्याशी लग्न; कुटुंबात आजोबांपासून सर्वजण सनदी अधिकारी
नवी दिल्ली - युपीएससी परीक्षेत टीना डाबीने देशात पहिला क्रमांक मिळवला होता. त्यानंतर, ती आयएएस अधिकारी बनली. त्यामुळे, टीना डाबी चांगलीच चर्चेत होती. गेल्या वर्षीच टीना डाबीचे IAS प्रदीप गावंडे यांच्यासमवेत लग्न झाले होते, नुकतेच त्या आई बनल्या आहेत. त्यानंतर, आता त्यांची लहान बहिण रिया डाबी यांनीही लग्न केलं असून रियाचे पती आयपीएस अधिकारी आहेत. आयपीएस मनोज कुमार यांच्यासोबत रियाने लग्न केलं, दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियातून समोर आले आहेत. त्यात दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.
रिया डाबी आणि मनोज कुमार हे दोघेही युपीएससी स्पर्धेतून अधिकारी बनले आहेत. या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गज सनदी अधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे डाबी कुटुंबीयांत अनेकजण सनदी अधिकारी आहेत. रियाची मोठी बहिण टीना डाबी याही आयएएस अधिकारी आहेत. तर, तिचे पती प्रदीप गावंडे हेही आयएएस आहेत.
रियाचे आजोबा नंद किशोर हे सीएसआयआरमध्ये अधिकारी होते. तर, रियाचे वडिल जसवंत हे युपीएससीतून इंडियन इंजिनिअरींग सर्व्हीसेसची परीक्षा पास झाले होते. त्यातून ती सनदी अधिकारी बनले. त्यानंतर, त्यांच्या दोन्ही कन्या आएएएस अधिकारी आहेत. आता, त्यांचे दोन्ही जावईही युपीएससी परीक्षेतून बनलेले अधिकारी आहेत. त्यामध्ये, रियाचे पतीन मनोज कुमार हे आयपीएस अधिकारी आहेत.
दरम्यान, रिया डाबी आणि मनोज कुमार यांनी २०२३ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. आता, त्यांनी काही जवळच्या नातलगांच्या उपस्थितीत लग्नसोहळा आयोजित करुन लग्न केलं. रियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन धन्यवाद लिहून लग्नाचा फोटो शेअर केला आहे. रियाने लग्नात लाल रंगाची साडी परिधान केली असून त्यावर ओढणीही दिसून येते.