VIDEO: १०० कोटींचा घोटाळा समोर आणणाऱ्या IAS अधिकाऱ्याने काढल्या उठा-बशा; मान्य केली चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:16 IST2025-07-30T11:51:38+5:302025-07-30T12:16:10+5:30

उत्तर प्रदेशात कामाच्या पहिल्याच दिवशी कान धरुन उठा बशा काढणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

IAS officer do situps in Shahjahanpur SDM Rinku Singh Rahi himself told the reason | VIDEO: १०० कोटींचा घोटाळा समोर आणणाऱ्या IAS अधिकाऱ्याने काढल्या उठा-बशा; मान्य केली चूक

VIDEO: १०० कोटींचा घोटाळा समोर आणणाऱ्या IAS अधिकाऱ्याने काढल्या उठा-बशा; मान्य केली चूक

IAS Rinku Singh Viral Video: उत्तर प्रदेशात एका आयएएस अधिकाऱ्याचा कान धरून उठा-बशा काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अधिकाऱ्याने कर्तव्याच्या पहिल्याच दिवशी केलेल्या या कृत्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. लिपिकासोबत झालेल्या गैरवर्तनामुळे संतप्त झालेल्या वकिलांना शांत करण्यासाठी आयएएस अधिकाऱ्याने उठा-बशा काढून त्यांची माफी मागितली. महत्त्वाचे म्हणजे १५ वर्षांपर्वी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रिंकू राहीवर सहा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या ज्यामुळ त्यांच्या जबड्याला दुखापत झाली होती आणि त्यांनी एका डोळ्याची दृष्टी गमावली होती.

व्हायरल होणारा व्हिडीओ हा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे उपविभागीय दंडाधिकारी. म्हणून नियुक्त झालेले आयएएस अधिकारी रिंकू सिंह राही यांचा आहे. या व्हिडिओमध्ये ते तहसील परिसरात वकिलांच्या समोर कान धरून उठाबशा करताना दिसत आहेत. जेव्हा एका वकिलाने त्यांचा हात धरून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते नकार देतात. वकील राहू दे, राहू दे असं म्हणत होते. पण आयएएस अधिकाऱ्याने ऐकले नाही.

अलिकडेच त्यांची शाहजहानपूर येथे एसडीएम म्हणून बदली झाली. त्याआधी त्यांची मथुरा येथे नियुक्ती होती. मंगळवारीच एसडीएम रिंकू सिंह राही यांनी पदभार स्वीकारला आणि तहसील परिसराची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी उघड्यावर लघवी करणाऱ्या चार लोकांना उठाबशा करायला लावल्या, ज्यामुळे वकिलांमध्ये  संताप निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पाहून एसडीएम रिंकू सिंह स्वतः आंदोलनस्थळी पोहोचले आणि वकिलांसमोर उठाबशा करून माफी मागितली. त्यांच्या या कृतीतर वातावरण शांत झाले.

एसडीएम रिंकू सिंह पाहणी करत असताना आजूबाजूचा परिसर घाणेरडा होता. काही लोक उघड्यावर लघवी करत होते. त्यामुळे त्यांना सार्वजनिक ठिकाणी उठाबशा काढायला लावल्या. मात्र काही वकिलांना याचा राग आला. वकिलांच्या एका गटाने आवारातील घाणेरड्या शौचालये आणि भटक्या प्राण्यांकडे लक्ष वेधले, तेव्हा रिंकू सिंह राही यांनी त्यांची चूक मान्य केली आणि त्यांचे कान धरून स्वतः उठाबशा काढल्या. या दरम्यान काही वकिलांनी त्यांना थांबवले, पण ते थांबले नाहीत.

कोण आहेत रिंकु सिंह राही?

रिंकू सिंह हे यापूर्वीही त्यांच्या धाडसामुळे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईमुळे चर्चेत राहिले आहेत. रिंकू सिंह २०२२ मध्ये यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस झाले. २० मे १९८२ रोजी अलिगडमधील एका गरीब मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रिंकू सिंह यांनी एनआयटी जमशेदपूरमधून धातूशास्त्रात बी.टेक केले आहे. त्यांनी देशातून गेट परीक्षेत १७ वा क्रमांक मिळवला. २००४ मध्ये वरिष्ठ अधीनस्थ सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते समाज कल्याण अधिकारी झाले. 

२००८ मध्ये त्यांची पोस्टिंग मुझफ्फरनगरमध्ये झाली. त्यांनी मुझफ्फरनगरमध्ये शिष्यवृत्ती योजनेत सुमारे १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड केला होता. यामुळे २००९ मध्ये त्यांच्यावर हल्ला झाला. बॅडमिंटन खेळत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.  रिंकू सिंह राहींना ६ ते ७ गोळ्या लागल्या. त्या हल्ल्यात ते थोडक्यात बचावला पण त्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. एका डोळ्यालाही दुखापत झाली. हल्ल्यात जखमी झालेल्या रिंकू सिंह राहींवर अनेक महिने उपचार सुरू होते. बराच काळ त्रास सहन करूनही रिंकू सिंह यांनी हिंमत गमावली नाही. त्यांनी समोर आणलेल्या  प्रकरणात अनेक आरोपींना शिक्षा झाली आणि काहींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. रिंकू सिंह राहींनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. २०१२ मध्ये त्यांनी लखनऊ संचालनालयाबाहेर उपोषणही केले होते. या संघर्षातही रिंकू सिंह २०२२ मध्ये यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस झाले.

Web Title: IAS officer do situps in Shahjahanpur SDM Rinku Singh Rahi himself told the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.