दिल्लीमध्ये आयएएस कोचिंग सेंटरमध्ये भरलं पाणी, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 23:47 IST2024-07-27T23:47:04+5:302024-07-27T23:47:35+5:30
Delhi News: दिल्लीमध्यी ओल्ड राजेंद्रनगर यथे असलेल्या RAUS इन्स्टिट्युट आयएएस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तिथे दोन-तीन विद्यार्थी अडकले. हे वृत्त समजताच अग्निशमन दलाची सात वाहने घटनास्थळी पोहोचली. त्याशिवाय एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली.

दिल्लीमध्ये आयएएस कोचिंग सेंटरमध्ये भरलं पाणी, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
दिल्लीमध्यी ओल्ड राजेंद्रनगर यथे असलेल्या RAUS इन्स्टिट्युट आयएएस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तिथे दोन-तीन विद्यार्थी अडकले. हे वृत्त समजताच अग्निशमन दलाची सात वाहने घटनास्थळी पोहोचली. त्याशिवाय एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाली. तसेच घटनेचं गांभीर्य विचारात घेऊन दिल्लीचे महापौर आणि आमदार दुर्गेश पाठक हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी या घटनेबाबत माहिती देताना यासाठी जो कुणी जबाबदार असेल त्याच्याविरुद्ध कठोर करण्यात येईल, असे सांगितले. त्यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये सांगितले की, दिल्लीमध्ये संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे एक दुर्घटना घडल्याचं वृत्त आहे. राजेंद्रनगर येथे एका कोचिंग इन्स्टिट्युटच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याचं वृत्त आहे. दिल्लीचं अग्निशनम दल आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदारही तिथे पोहोचले आहेत.
आतिषी यांनी पुढे लिहिले की, मी या घटनेबाबत मिनिटा मिनिटाची माहिती घेत आहे. ही घटना कशी घडली, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेसाठी जो कुणी जबाबदार असेल त्याला सोडलं जाणार नाही.