वडील चालवतात किराणा दुकान; लेकाने 28 लाख पगाराची नोकरी सोडली अन् झाला IAS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 03:46 PM2023-07-28T15:46:07+5:302023-07-28T16:08:55+5:30

नागरी सेवा ही देशातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा आहे. दरवर्षी लाखो तरुण या परीक्षेसाठी अर्ज करतात, मात्र यश ...

IAS Ayush Goyal Success story in delhi | वडील चालवतात किराणा दुकान; लेकाने 28 लाख पगाराची नोकरी सोडली अन् झाला IAS अधिकारी

वडील चालवतात किराणा दुकान; लेकाने 28 लाख पगाराची नोकरी सोडली अन् झाला IAS अधिकारी

googlenewsNext

नागरी सेवा ही देशातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा आहे. दरवर्षी लाखो तरुण या परीक्षेसाठी अर्ज करतात, मात्र यश केवळ मेहनतीने तयारी करणाऱ्यांनाच मिळते. UPSC परीक्षेची इतकी क्रेझ आहे की काही जण लाखो रुपयांची नोकरी सोडून ही परीक्षा देतात. आयुष गोयलचं नावही अशा लोकांमध्ये सामील आहे, ज्याने 28 लाखांहून अधिक रुपयांची नोकरी सोडून UPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. 

दिल्लीतील आयुष गोयलने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी 28 लाख रुपये पगाराची नोकरी सोडली. आयुष गोयलची UPSC कहाणी लोकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. आयुष गोयलने दिल्लीतील राजकीय प्रतिभा विकास विद्यालय या सरकारी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. येथे शिक्षण घेतल्यानंतर त्याने दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून बीए इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवी मिळवल्यानंतर आयआयएममधून एमबीए केले. आयुषचे वडील किराणा दुकान चालवतात, तर आई गृहिणी आहे.

राजकीय प्रतिभा विकास विद्यालय ही दिल्लीतील एक सरकारी संस्था आहे जिथे आयुष गोयलने त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशननंतर मी कॅटची परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झालो असं म्हटलं. वृत्तानुसार, आयुषने एमबीए केल्यानंतर जेपी मॉर्गन जॉईन केले आणि जिथे त्याला वर्षाला 28 लाख पगार मिळत होता, परंतु काही काळानंतर त्याचं कामात मन रमलं नाही. अशा परिस्थितीत त्याने नागरी सेवांसाठी तयारी करण्याचं ठरवलं.

आयुषने नोकरी सोडली आणि सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस अभ्यास सुरू केला. त्यांनी अभ्यासासाठी एक टाईम टेबल बनवलं होतं. दीड वर्षापासून घरी राहून UPSC ची तयारी करत आहे आणि कोचिंगशिवाय पुस्तकं आणि ऑनलाइन व्हिडिओ पाहून 8 ते 10 तास सतत अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले. यामुळे घरातील सर्वजण खूप खूश आहेत. इतक्या लवकर त्याला मोठं यश मिळेल असं वाटलं नव्हतं.

सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केल्यानंतर त्याने पहिलाच प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने प्रिलिम्स क्लिअर केले आणि मेनपर्यंत पोहोचला आणि शेवटी मुलाखतीला पोहोचला. आयुषची मेहनत फळाला आली आणि त्याने 171 वा क्रमांक मिळविला. UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याने रात्रंदिवस अभ्यास केला आणि मेहनतीने आणि समर्पणाने IAS अधिकारी बनला.
 

Web Title: IAS Ayush Goyal Success story in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.