शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

हवाई दलाच्या बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास 5 लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 10:43 IST

हवाई दलाचे एएन-32 मालवाहतूक विमान सोमवारी (3 जून) दुपारी बेपत्ता झाले आहे. हे विमान दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. पण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

ठळक मुद्देहवाई दलाचे एएन-32 मालवाहतूक विमान सोमवारी (3 जून) दुपारी बेपत्ता झाले आहे. हवाई दलाने या विमानाची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. विमानाची ठोस माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - हवाई दलाचे एएन-32 मालवाहतूक विमान सोमवारी (3 जून) दुपारी बेपत्ता झाले आहे. हे विमान दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते. पण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटताच हवाई दलाने विमानाचा शोध सर्वत्र सुरू केला आहे. मात्र अद्याप या बेपत्ता विमानाचा शोध लागलेला नाही. हवाई दलाने या विमानाची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. विमानाची ठोस माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. 

शिलाँगमध्ये संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर मार्शल आर. डी. माथूर, AOC इन कमांड, इस्टर्न एअर कमांड यांनी या बेपत्ता विमानाची माहिती सांगणाऱ्याला पाच लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. बेपत्ता विमानाच्या लोकेशनची माहिती 0378-3222164, 9436499477, 9402077267, 9402132477 या क्रमांकावर देता येईल असं ही विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी म्हटलं आहे. विमानात आठ कर्मचारी आणि पाच जवान आहेत. विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लावल्या आहेत. 

पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचे विमान झाले गायब; कुटुंबीय चिंताग्रस्तहवाई दलाचे एएन-32 मालवाहतूक विमान सोमवारी दुपारी बेपत्ता झाले. वैमानिक आशिष तन्वर (29) हेही बेपत्ता झाले. त्यांची पत्नी संध्या हवाई दलाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात सेवेवर होत्या. पत्नीच्या डोळ्यादेखत पायलट पतीचे विमान रडारवरून गायब झाले. हा घटनाक्रम त्यांनी जवळून अनुभवला. एएन-32 ने दुपारी 12.25 च्या सुमारास आसामच्या जोरहट तळावरुन अरुणाचल प्रदेशमधील मिचुका येथे जाण्यासाठी उड्डाण केले. तन्वर कुटुंबिय मूळचे हरयाणाच्या पलवलचे आहे. हुडा सेक्टर 2 येथे ते राहतात. एएन-32 विमानाचा अजूनही शोध लागलेला नाही. प्रत्येक तासागणिक कुटुंबाची चिंता वाढत चालली आहे. अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आणि अद्ययावत माहिती मिळावी म्हणून आशिषचे वडिल राधेलाल आसामला गेले आहेत. त्याची आई घरीच आहे. या घटनेमुळे आई पूर्णपणे कोसळून गेली आहे. त्यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बेपत्ता विमानाच्या शोधासाठी सर्व ती यंत्रणा कामी आणावी अशी मागणी केली. तन्वर कुटुंबाला लष्करी सेवेची परंपरा आहे. आशिषची मोठी बहिणही हवाई दलामध्ये स्क्वाड्रन लीडर आहे.

बेपत्ता वैमानिक मुलाच्या शोधासाठी वडिलांची शर्थ

हवाई दलाच्या बेपत्ता असलेल्या एएन-32 विमानामधील तेरा जणांपैकी फ्लाईट लेफ्टनंट मोहित गर्ग (27) हेही एक आहेत. काही दिवसांपूर्वीच सुटी संपवून ते सेवेत दाखल झाले होते. गर्ग यांचे कुटुंबीय पतियाळा (पंजाब) येथील सामना गावी परतले असून, काही तरी चमत्कार घडावा अशी प्रार्थना करीत आहेत. मोहित यांची आई सुलोचना देवी हृदय विकाराने त्रस्त असल्याने त्यांना या दुर्घटनेबाबत काही सांगण्यात आलेले नाही. मोहित यांचे वडील शोधासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत.

कोसळलेले पाचवे विमान

यापूर्वी याच जातीची आणखी चार विमाने अशीच कोसळली होती. रशियाहून पाठवण्यात आलेले पहिलेच विमान मार्च 1986 मध्ये कोसळले होते. ते विमान व त्यातील सातही जणांना पत्ताच लागला नव्हता. चार वर्षांनी केरळच्या पोनमुडी गावापाशी दुसरे विमान कोसळले. जून 2009 मध्ये अरुणाचल प्रदेशातच एक विमान कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या विमानांमध्ये सुधारणा केल्या. तरीही 12 जुलै 2016 रोजी चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला निघालेले विमान बेपत्ता झाले. त्याचा शोध लागला नाही. 

टॅग्स :airforceहवाईदलairplaneविमान