शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 12:29 IST

आगामी निवडणुकीनंतर सत्तांतर होईल; पवारांचं भाकीत

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तांतर होईल आणि पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. निवडणूक निकालाच्या आधारावर सर्व पक्ष एकत्र येऊन एक किमान समान कार्यक्रम तयार करतील आणि नवं सरकार स्थापन होईल, असंही पवार म्हणाले. ते आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या 'मुंबई मंथन' कार्यक्रमात बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, असा दावा शरद पवारांनी केला. 'देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीनंतर देशात आघाडी सरकार स्थापन होऊ शकतं. मोदी त्यांच्या पक्षाचे सर्वात शक्तिशाली नेते आहेत. मात्र त्यांना देशाचे सामर्थ्यशाली नेते मानण्याची चूक करु नका,' असं शरद पवार म्हणाले. पुढील निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असं भाकितदेखील त्यांनी वर्तवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्यक्तीमत्त्व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखं नाही, याकडे पवारांनी लक्ष वेधलं. मोदी आणि वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्त्वात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्त्वाखाली आघाडी सरकार स्थापन होण्याचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले. देशाचा पुढील पंतप्रधान ठरवण्यात आपली भूमिका महत्त्वाची असेल, असं सूचक विधान त्यांनी केलं. केवळ सत्तेसाठी सर्व विरोधक एकत्र येतात, या मोदींच्या टीकेलादेखील पवारांनी उत्तर दिलं. 2014 मध्ये मिळवलेला एकतर्फी विजय सोडल्यास त्याआधी भाजपानंदेखील कायम आघाडीच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण पवारांनी करुन दिली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस