शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

...तेव्हा भारतासमोर मैत्रीचा हात पुढे करेन- इम्रान खान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 7:45 AM

बिघडलेल्या संबंधांचं खापर खान यांनी भारतावर फोडलं

इस्लामाबाद: भारतात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे करेन, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. सध्या भारतात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा महत्त्वाचा असल्यानं मोदी सरकारनं आमचा मैत्रीचा प्रस्ताव फेटाळला आहे, असं खान म्हणाले. रियाधमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फ्युचर इन्व्हेस्टमेंट एनिशिएटिव्ह फोरममध्ये ते बोलत होते. पाकिस्तानला आपल्या सर्व शेजाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असं इम्रान खान यांनी म्हटलं. 'आम्हाला भारत आणि अफगाणिस्तानसोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत. भारतासोबत सलोख्याचे संबंध राखल्यास त्याचा फायदा दोन्ही देशांना होईल. यामुळे शस्त्रास्त्र स्पर्धा कमी होईल आणि मानवी संसाधनांचा वापर विकासासाठी करता येईल,' असा इरादा त्यांनी बोलून दाखवला. पाकिस्तानला अफगाणिस्तानसोबतही चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. अफगाणिस्तानात शांतता असल्यास द्विपक्षीय संबंध सुधारतील. यामुळे व्यापार वाढेल. सोबतच मध्य आशियाई देशांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ होईल, असं इम्रान खान यांनी म्हटलं. मी पंतप्रधान होताच भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. मात्र भारतानं त्याला प्रतिसाद दिला नाही, असं म्हणत खान यांनी दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांचं खापर भारतावर फोडलं. इम्रान खान ऑगस्टमध्ये सत्तेवर आले. त्यानंतर लगेचच त्यांनी मोदींना पत्र लिहिलं होतं. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. भारतानं याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची निर्घृण हत्या केली. त्यामुळे भारतानं परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९lok sabhaलोकसभा