शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

"मला फटकारलं गेलं...", भाजपकडून मिळालेल्या सल्ल्यावर कंगना यांनी मौन सोडलं; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:52 IST

"...जर माझ्यामुळे खरोखरोच पक्षाच्या उद्देशाला पक्षाच्या स्थितीला अथवा धोरणाला धक्का लागला असेल तर माझ्यापेक्षा अधिक दुःख कुणालाही होऊ शकत नाही."

भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा खासदार तथा प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत यांनी पक्षाकडून मिळालेल्या सल्ल्यावर मौन सोडले आहे. कंगना रणौत यांनी नुकतेच शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली उपद्रवी लोक हिंसाचार पसरवत होते. तसेच तेथे बलात्कार आणि हत्या होत होत्या, असे कंगना यांनी म्हटले होते. मात्र, त्यांच्या या विधानाशी भाजपने असहमती दर्शवत त्यापासून स्वतःला दूर ठेवले होते.

इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत कंगना म्हणाल्या, "मला पक्ष नेतृत्वाने फटकारले आणि मला यात कोणतीही अडचण नाही. मी पक्षाचा शेवटचा आवाज आहे, असे मला वाटत नाही. असे मानायला मी एवढी वेडी अथवा मूर्खही नाही. मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मला वाटते, जर माझ्यामुळे खरोखरोच पक्षाच्या उद्देशाला पक्षाच्या स्थितीला अथवा धोरणाला धक्का लागला असेल तर माझ्यापेक्षा अधिक दुःख कुणालाही होऊ शकत नाही."

शेतकरी आंदोलनासंदर्भात काय म्हणाल्या होत्या कंगना? -भाजपच्या हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत एका मुलाखतीत बोलताना म्हणाल्या होत्या, "शेतकरी आंदोलनाच्या काळात काय घडले, हे ससर्वांनीच बघितले आहे. आंदोलनाच्या आडून हिंसा भडकावली गेली. तेथे बलात्कार होत होते. लोकांना मारून फासावर लटकावले जात होते. सरकारने जेव्हा तीन कृषि कायदे मागे घेतले, त्यावेळी सगळ्या उपद्रवी आंदोलकांना धक्का बसला, कारण त्यांचे नियोजन खूप दीर्घकाळाचे होते."

अशी होती भाजपची भूमिका -कंगना रणौत यांनी केलेल्या या विधानानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते हरजीत सिंह ग्रेवाल यांनी कंगना रणौतच्या विधानाशी भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, "शेतकऱ्यांबद्दल बोलणे हे कंगना यांचे काम नाही. कंगना यांचे हे वैयक्तिक विधान आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या बाजूने आहेत. कंगना रणौत यांनी अशी विधाने करू नये. असे बोलणे टाळायला हवे.", अशी भूमिका ग्रेवाल यांनी मांडली होती.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाFarmerशेतकरी