"मला फारुक अब्दुल्लांना २० वर्षांपासून मारायचं होतं"; माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार करणारा कमल सिंह कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 08:05 IST2026-03-12T08:02:52+5:302026-03-12T08:05:25+5:30

Farooq abdullah shooting: जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. एका लग्नसोहळ्यात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

"I wanted to kill Farooq Abdullah for 20 years"; Who is Kamal Singh who shot at the former Chief Minister? | "मला फारुक अब्दुल्लांना २० वर्षांपासून मारायचं होतं"; माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार करणारा कमल सिंह कोण?

"मला फारुक अब्दुल्लांना २० वर्षांपासून मारायचं होतं"; माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार करणारा कमल सिंह कोण?

Farooq abdullah shot: बुधवारी रात्री उशिरा एका लग्न सोहळ्यात असताना जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रयत्न झाला. ज्यावेळी अब्दुल्लांवर गोळी झाडण्यात आली, तेव्हा त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरीही होते. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात आरोपी अचानक रिव्हॉल्व्हर काढतो आणि जवळून त्यांच्यावर गोळी झाडताना दिसत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूतील ग्रेटर कैलास परिसरात असलेल्या रॉयल पार्कमध्ये एक लग्न सोहळा होता. त्याच सोहळ्यात ही घटना घडली. फारुक अब्दुल्ला यांच्या सुरक्षा पथकात पोलीस आणि एनएसजी कमांडो होते. त्यांनी लगेच आरोपीला रोखल्याने अब्दुल्लांचा जीव वाचला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याचे रिव्हॉल्व्हरही ताब्यात घेतले आहेत. 

फारुक अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करतानाचा व्हिडीओ

फारुक अब्दुल्लांवर गोळी झाडणारा कलम सिंह कोण?

पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव कमल सिंह जामवाल असे आहे, तो जम्मूतील पुरानी मंडी भागात राहतो. कमल सिंह जामवाल याचा जन्म १९६३ मध्ये झाला होता. जम्मूतील ओल्ड सिटी परिसरात त्याचे अनेक गाळे आहेत. ते गाळे भाड्याने दिलेले असून, त्यातून येणाऱ्या पैशांवर तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

२० वर्षांपासून अब्दुल्लांना मारायचे आहे

पोलिसांनी केलेल्या चौकशी आरोपीने धक्कादायक विधान केले. तो म्हणाला की, 'मला २० वर्षांपासून फारुक अब्दुल्ला यांना मारायचे होते. हा माझा वैयक्तिक अजेंडा आहे.'

फारुक अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली रिव्हॉल्व्हर आरोपीची स्वतःची आहे. 

नॅशनल काँन्फरन्सचे लीगल सेलचे अध्यक्षांच्या मुलीचे लग्न होते. तिथे फारुक अब्दुल्ला आमच्यासोबत बसलेले होते. थोड्यावेळाने ते म्हणाले की, चला निघुयात. आम्ही सगळे निघालो होतो, त्याचवेळी एक व्यक्ती आला आणि त्याने पाठीमागून रिव्हॉल्व्हर रोखली. सुरक्षारक्षकांनी क्षणार्धात त्याला रोखले आणि गोळी हवेत मारली गेली, असे तिथे उपस्थित असलेल्या राकेश सिंह यांनी सांगितले. 

Web Title : फारूक अब्दुल्ला पर जानलेवा हमला: कमल सिंह कौन है?

Web Summary : फारूक अब्दुल्ला पर एक शादी समारोह में गोली चलाई गई। हमलावर कमल सिंह जामवाल गिरफ्तार, 20 साल से अब्दुल्ला को मारना चाहता था। मकसद निजी, हथियार उसका अपना।

Web Title : Attempt on Farooq Abdullah's life: Who is Kamal Singh?

Web Summary : Farooq Abdullah survived a shooting at a wedding. The assailant, Kamal Singh Jamwal, arrested, confessed to wanting to kill Abdullah for 20 years. Motive is personal, weapon his own.