"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:22 IST2025-11-03T15:21:36+5:302025-11-03T15:22:23+5:30

अहमदाबाद विमान दुर्घटनेत विमानातील २४२ प्रवाशांपैकी केवळ एका प्रवाशाचा जीव वाचला होता.

"I survived then, but now every day..."; The only survivor of the Ahmedabad plane crash grieves over 'this'! | "तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

Ahmedabad Plane Crash Surviver:  १२ जून रोजी झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेतून देश अद्याप सावरलेला नाही. या अपघातात अनेकांनी आपल्या कुटुंबातील लोक गमावले. इतकंच नाही तर या अपघातात अनेक कुटुंब देखील मृत्युमुखी पडली. या विमानातील २४२ प्रवाशांपैकी केवळ एका प्रवाशाचा जीव वाचला. अनेकांना हा चमत्कारच वाटला. मात्र, या अपघातातून बचावलेले एकमेव व्यक्ती विश्वास कुमार रमेश हे त्या दिवसापासून दुःखात आहेत. विश्वासकुमार अपघातातून बचावले असले, तरी त्यांना बसलेला मानसिक धक्का फार मोठा आहे. त्यांना अद्यापही त्यातून पूर्णपणे सावरता आलेले नाही. या आपघाताच्या चार महिन्यानंतर त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

या घटनेबद्दल बोलताना विश्वासकुमार म्हणाले, "सगळे म्हणतात की मी भाग्यवान आहे, एका मोठ्या दुर्घटनेतून बचावलो. पण, त्या घटनेने माझे पूर्ण आयुष्य बदलून टाकले."

१२ जून रोजी विश्वासकुमार लंडनला जाणारे विमान 'एआय १७१'ने प्रवास करत होते. मात्र, उड्डाण घेताच  विमान अहमदाबादमधील एका वैद्यकीय वसतिगृहावर कोसळले. अपघातादरम्यान विश्वासकुमार यांचा जीव वाचला, परंतु त्याचा धाकटा भाऊ अजय या अपघातात मृत्युमुखी पडला. तो विमानाच्या पुढच्या सीटवर बसला होता. या अपघातात भाऊ गमावल्याचे दुःख अजूनही त्यांच्या मनातून कमी झालेले नाही. विश्वास कुमार रमेश म्हणाले की, "माझा भाऊ माझी ताकद होता. प्रत्येक अडचणीत तो माझ्यासोबत खंबीरपणे उभा असायचा. आता मी एकटा पडलोय. ना मुलांशी बोलावं वाटत, ना पत्नीशी संवाद साधावा वाटतं. मी एकटाच खोलीत बसून राहतो."

अपघातानंतर 'या' आजाराशी झुंज

अपघातानंतर, डॉक्टरांनी विश्वासकुमार यांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असल्याचे निदान केले. लंडनला परतल्यानंतर त्यांना मानसिक आरोग्यावर कोणताही उपचार मिळालेला नाही. रमेश म्हणाले की, त्यांचे संपूर्ण कुटुंब अद्याप या दुर्घटनेतून सावरलेले नाही. "माझी आई दररोज दाराशी बसते, कोणाशीही बोलत नाही. मलाही कोणाशीही बोलायचे नाही. आमच्यासाठी प्रत्येक दिवस वेदनादायक असतो", असे ते म्हणाले.

अपघाताच्या खुणा अजूनही शरीरावर!

रमेश यांच्या शरीरावर अपघाताचे व्रण आहेत. त्यांनी म्हटले की, "विमानाच्या उघड्या भागातून सीट ११अ वरून बाहेर पडताना गंभीर दुखापत झाली. माझे पाय, खांदे, गुडघे आणि पाठ अजूनही दुखत आहे. मी चालू शकत नाही, पण माझी पत्नी मला मदत करते."

एअर इंडियाकडून पीडित कुटुंबांना मदत

एअर इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नियमितपणे पीडितांच्या कुटुंबियांना भेटत आहेत. एअरलाइनने असेही म्हटले आहे की, रमेश यांच्या प्रतिनिधींना भेटीची ऑफर पाठवण्यात आली होती, परंतु कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. कंपनीने रमेश यांना £२१,५०० (अंदाजे ₹२५ लाख) अंतरिम भरपाई देऊ केली, जी त्यांनी स्वीकारली.परंतु त्यांच्या सल्लागारांचे म्हणणे आहे की, ही रक्कम त्यांच्या सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरी आहे. 

Web Title : अहमदाबाद विमान दुर्घटना में बचे व्यक्ति का दर्द: 'अब हर दिन दर्दनाक है'.

Web Summary : अहमदाबाद विमान दुर्घटना से बचे विश्वास कुमार अपने भाई के नुकसान और PTSD से जूझ रहे हैं। वे अलग-थलग महसूस करते हैं, शारीरिक दर्द से लड़ते हैं, और कहते हैं कि हर दिन त्रासदी की दर्दनाक याद दिलाता है, भले ही उन्हें भाग्यशाली कहा जाता हो।

Web Title : Ahmedabad Plane Crash Survivor's Grief: 'Every day is painful now'.

Web Summary : Ahmedabad crash survivor, Vishwas Kumar, struggles with the loss of his brother and PTSD. He feels isolated, battles physical pain, and says every day is a painful reminder of the tragedy, despite being called lucky.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.