शहरं
Join us  
Trending Stories
1
"वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी..."; देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मत
2
'गजवा-ए-हिंद'साठी पाक फौजा तयार, लष्कर ए तैयबाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ, थेट मोदींना धमकी
3
फक्त एका कुपनच्या जोरावर जगाला लुटणारा 'महाठग'; आजही त्याच मॉडेलवर चालतात मोठमोठे स्कॅम
4
"मी राजसाहेबांना डायरेक्ट बोललो, याला तिकीट देऊ नका, कारण..."; आमदार महेश सावंतांचा गंभीर दावा
5
फक्त तेलच नाही, तर व्हेनेजुएलात दडलाय सोन्या-चांदीचा मोठा खजिना; ट्रम्प यांचा त्यावर डोळा...
6
Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
7
अजबच! इथे भाजपाने चक्क काँग्रेससोबत केली युती, मित्रपक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं समीकरण 
8
"आम्ही सुधारणार नाही’ हीच निवडणूक आयोगाची भूमिका"; 'बिनविरोध'च्या मुद्द्यावर काँग्रेसची टीका
9
धूम-३ स्टाईल चोरी, एक बसायचा दुकानात, दुसरा करायचा चोऱ्या, जुळ्या भावांचा प्रताप, पोलीसही अवाक्, अखेरीस...  
10
Beed Crime: बीडमध्ये खड्डा खोदणाऱ्या कामगाराची गोळ्या घालून हत्या, शहरात खळबळ 
11
७ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या गर्भवती पत्नीला संपवलं; पुरावे नष्ट करण्यासाठी घरामागेच अंत्यसंस्कार
12
Video: रोहित शर्माशी चाहत्यांचे गैरवर्तन; भररस्त्यात कारमधूनच 'हिटमॅन'ने घेतली फॅनची शाळा
13
फक्त १ वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड घेताय? थांबा! राधिका गुप्ता यांनी सांगितला गुंतवणुकीचा 'सुरक्षित' मंत्र
14
छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते; गुजरातच्या भाजपा नेत्याचं खळबळजनक विधान
15
"तुमको मिर्ची लगी तो मै क्या करूं..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला
16
टाटा-रिलायन्सला धक्का! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे १.३५ लाख कोटी स्वाहा!
17
२१ वर्षीय युवक होता अनेक दिवस बेपत्ता; 'इन्स्टाग्राम'वरील मैत्रिण निघाली ४० वर्षीय विधवा, मग...
18
Municipal elections 2026: मतदाराला चार मते द्यावीच लागणार; मग ते उमेदवार असो की 'नोटा'? 
19
’मनपा निवडणुकांतही काँग्रेसचा झंझावात दिसेल; भाजपा, महायुतीच्या हुकूमशाहीला धडा शिकवा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं आवाहन      
20
"अजून ७० हजार कोटींचा निकाल लागलेला नाही, आम्ही मागची पानं चाळली तर त्यांना...", अजित पवारांना बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Video: मी देशवासियांची मनापासून क्षमा मागतो; आमच्या तपस्येतच काही कमी राहिली- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 09:40 IST

आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं.

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाच दशकांच्या सार्वजनिक जीवनात शेतकऱ्यांचे त्रास-समस्या अनुभवल्या, त्यामुळे देशाने पंतप्रधानपदी निवड केली. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझ्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं. तसेच देशात 10 कोटींहूनअधिक शेतकरी अल्पभूधारक; त्यांना सरकारकडून मदत केली जात आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारने कृषी बजेट पहिल्यापेक्षा ५ पटीनं वाढवलं आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न केलं, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला होता, असं मोदी यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची मनापासून क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल.  शेतकऱ्यांना आम्ही काही खऱ्या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार