केंद्रीय गृह मंत्री अमित शाह सध्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी कोलकात्यातील संतोष मित्रा स्क्वायर येथील दुर्गा पूजा मंडपाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाल, "मी दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना केली आहे की, 2026 मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर, असे नवे सरकार स्थापन व्हावे, जे पुन्ह 'सोनार बांगला'चे गत वैभव मिळवून देईल.
शाह पुढे म्हणाले, बंगालने सुरक्षित, शांततापूर्ण आणि समृद्ध बनायला हवे. यामुळे नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे स्वप्न पूर्ण होईल. पंडालच्या उद्घाटनावेळी त्यांनी बंगाल आणि देशवासियांना दुर्गा पूजेच्या शुभेच्छा दिल्या.
पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमधील मृतांना श्रद्धांजली -अलीकडेच राज्यात मुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती अमित शाह यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, "पश्चिम बंगालमधील पावसाशी संबंधित घटनांमध्ये प्राण गमावलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो." 23 सप्टेंबर रोजी कोलकाता महानगर आणि आसपासच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे 11 जणांचा मृत्यू झाला होता.
असा आहे अमित शाह यांचा कार्यक्रम -शाह गुरुवारी रात्री कोलकात्यात दाखल झाले, भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात शाह दक्षिण कोलकात्यातील कालीघाट मंदिरात पूजा अर्चना करणार असून, त्यानंतर साल्ट लेक येथील भाजपा समर्थित पश्चिम बंगाल संस्कृती मंचाच्या दुर्गा पूजा मंडपाचे उद्घाटनही करणार आहेत.
Web Summary : Amit Shah, during his Bengal visit, prayed to Durga Mata for a government that restores 'Sonar Bangla' after the 2026 elections. He also paid respects to rain-related tragedy victims and will inaugurate Durga Puja pandals.
Web Summary : अमित शाह यांनी बंगाल दौऱ्यात दुर्गा मातेकडे 2026 च्या निवडणुकीनंतर 'सोनार बांग्ला' सरकार स्थापन व्हावे, अशी प्रार्थना केली. पावसामुळे झालेल्या दुर्घटनेतील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. ते दुर्गा पूजा मंडपांचे उद्घाटन करणार आहेत.