मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 06:45 IST2025-08-08T06:44:06+5:302025-08-08T06:45:11+5:30
दिवंगत कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय जागतिक परिषदेस पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. याप्रसंगी मोदी यांनी स्वामिनाथन यांच्या सन्मानार्थ एक स्मरण नाणे व तिकीट जारी केले.

मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
नवी दिल्ली : आमच्या शेतकरी बंधूचे हित ही आपल्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. भारत कधीही आपले शेतकरी, मासेमार आणि दुग्ध उत्पादकांच्या हितांशी तडजोड करणार नाही. त्यांच्या हितांच्या रक्षणासाठी मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. पण यासाठी मी तयार आहे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील टॅरिफ ५० टक्क्यांपर्यंत वाढविल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे वक्तव्य केले.
दिवंगत कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय जागतिक परिषदेस पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. याप्रसंगी मोदी यांनी स्वामिनाथन यांच्या सन्मानार्थ एक स्मरण नाणे व तिकीट जारी केले.
अमेरिकेची काय आहे मागणी?
अमेरिका भारताकडून मका, सोयाबीन, सफरचंद, बदाम, इथेनॉलसारख्या उत्पादनांवरील शुल्क कमी करणे आणि अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांना अधिक बाजार उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहे.
अमेरिकेने कोणते टॅरिफ किती वाढविले?
पुतिन भारतात येणार : रशियन राष्ट्राध्यक्ष व्ह्लादिमिर पुतिन लवकरच भारताला भेट देणार असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी सांगितले. रिपोर्टनुसार, ही भेट २०२५ च्या अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांची आणखी एक धमकी, निर्बंध लादणार
ट्रम्प यांना सांगितले की, भारतावर आणखी निर्बंध लावले जाणार आहेत.
टॅरिफ लावून फक्त आठच तास झाले आहेत. बघू काय होते. तुम्हाला आणखी खूप काही पाहायला मिळेल. तुम्हाला खूप दुय्यम निर्बंध पाहायला मिळतील.
चिप्स व सेमीकंडक्टर्सवर सुमारे १००% टॅरिफ लावण्यात येईल. मात्र, हे टॅरिफ फक्त आयात करणाऱ्यांसाठी असेल. अमेरिकेत उत्पादन करणाऱ्यांना सवलत मिळेल, असेही ट्रम्प यांनी सांगितले.